Teacher Explaining A Physics Concept: प्रत्येक शिक्षक मुलांना एखादा कठीण विषय शिकवताना प्रात्यक्षिके करून दाखवतात. ज्यामुळे तो विषय विद्यार्थ्यांना समजायला सोपा जातो. हे बहुतेक वेळा भौतिकशास्त्र(Physics) तासादरम्यान जास्त पाहिले जाते. या संदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राचा एक धडा शिकवत आहे. ज्यामध्ये तो काच आणि हवेचा अपवर्तक निर्देशांक दाखवत असताना अशी एक भन्नाट जादू करतो की सर्व विद्यार्थी बघतच राहतात.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक भौतिकशास्त्र विषयाचा शिक्षक मुलांना हवा आणि काचेचा अपवर्तक निर्देशांक वेगळा कसा असतो ते शिकवत आहे. ते सिद्ध करण्यासाठी तो दोन ग्लास वापरताना दिसत आहे. काही वेळाने शिक्षक एका काचेच्या ग्लासमध्ये वनस्पती तेल ओततो आणि त्यानंतर एक ग्लास दिसेनाचा होतो. यामुळे काच आणि तेलाचा अपवर्तक निर्देशांक समान आहेत असे स्पष्ट होते. मात्र अचानक एक ग्लास गायब झाल्याने ही एक प्रकारची जादूच घडलीय असं दिसतं.
( हे ही वाचा: Video: परदेशी सुनेची शेतात कांदे पेरण्याची पद्धत एकदा बघाच, यावर सासूने दिलेली प्रतिक्रिया होतेय तुफान Viral)
शिक्षकाने दाखलेली भन्नाट जादू एकदा पाहाच
( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)
हा व्हिडीओ दिपक प्रभू यांनी शेअर केला असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शिक्षक म्हणतात की जेव्हा अपवर्तक निर्देशांक समान असतात तेव्हा प्रकाश वाकत नाही आणि म्हणूनच काच आपल्याला दिसत नाही. हा व्हिडीओ ट्विटरवर ८०,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. भौतिकशास्त्र शिकवण्याच्या त्याच्या अनोख्या शैलीने नेटकऱ्यांना प्रभावित केले आहे.