Teacher Sends Obscene Photo To Students: सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला की तो वाऱ्याच्या वेगाने पसरू लागतो. अलीकडेच एक गाणं पतली कमारिया मोरी हे इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडेच गाजलं होतं. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तर यावर अक्षरशः रील्सचा पाऊस पाडला होता. इतकंच नव्हे तर अनेक शिक्षकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसह मिळून वर्गात नाचून असे रील्स बनवले होते. हे डान्स पाहता गुरुला देवाची उपमा देण्यावरून प्रश्न वजा टीकास्त्र सुद्धा उगारण्यात आले होते. पण आता तर या डान्सच्या पलीकडे जाऊन एका शिक्षिकेने चक्क आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यंत अश्लील फोटो पाठवल्याचे समजत आहे.

अमेरिकेच्या मेरीलँड भागातील एका शाळेत सदर प्रकार घडला. एका महिला शिक्षिकेने आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना स्वतःचे अश्लील फोटो पाठवले होते. हा मेल अनावधानाने पाठवण्यात आला असला तरी यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला होता. काहीच तासांमध्ये याबाबात शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत सुद्धा माहिती पोहोचली. संबंधित शिक्षिकेने चुकून हा मेल पाठवला होता.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
Rape on Minor Girl and then Accused Killed Her
Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या, मृतदेह बापगाव भागात फेकला; आरोपी विशाल गवळीला अटक
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…

हे ही वाचा<< विश्लेषण: ‘नंगटपणा’ मुळे उर्फी जावेदवर कारवाई होऊ शकते? अश्लीलतेबाबत कायदा काय सांगतो?

मुख्याध्यापकांनी महिला शिक्षिकेवरील कारवाईची माहिती देत सांगितले की, “या चुकीसाठी आम्ही संबंधित कर्मचारिकेवर कठोर कारवाई केलेली आहे.” मात्र यावेळी नक्की काय कारवाई केली याबाबत काहीच माहिती उघड केलेली नाही. सर्व विद्यार्थ्यांना संबंधित मेल आपल्या अकाऊंटमधून डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून हे फोटो इतरांसह शेअर करू नये तसेच कुठल्याच सोशल मीडियावर टाकू नये असेही शाळेकडून सांगण्यात आले आहे. यानंतर जर कोणत्याही विद्यार्थ्याला मानसिक काउन्सिलिंगची गरज असेल तर शाळेतर्फे सोय करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा<< Video: भीगी भीगी रातों में.. शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड डान्स करताना ‘ती’ तोंडावर पडली; चारचौघात जे झालं..

दरम्यान, शाळेशी संबंधित एका अन्य कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार शाळेने केवळ शाब्दिक समज देऊन शिक्षिकेवर कारवाई करणे टाळले असल्याचे समजत आहे. याप्रकरणी सध्या पोलीस तपास सुरु आहे.

Story img Loader