Teacher Shocking Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ फार हास्यास्पद असतात, तर काही खूप आश्चर्यकारक, भीतीदायक असे असतात. अनेकदा अशा व्हिडीओतील दृश्य इतकी धक्कादायक असतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या एका शाळेतील शिक्षकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात भरवर्गात एक शिक्षक असे काही विचित्र कृत्य करताना दिसत आहे, जे पाहून तुम्हालाही भीती वाटेल.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका शाळेच्या वर्गातील आहे, जिथे एक शिक्षक मुलांना फळ्यावर काही तरी लिहित शिकवत असतो. फळ्यावर लिहिता लिहिता तो शिक्षक असे काही विचित्र कृत्य करू लागतो की, पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना कुठली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांंचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी ही व्हिडीओ पाहिल्यानंतर शिक्षकाला भूतबाधा झाली की काय असा प्रश्न विचारत आहेत.
शिकवता शिकवता शिक्षक अचानक काढू लागला विचित्र आवाज
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक वर्गात आनंदाने विद्यार्थ्यांना शिकवत आहे, यावेळी फळ्यावर शिक्षक भौतिकशास्त्राची प्रमेये लिहित आहे. पण, शिकवता शिकवता हा शिक्षक अचानक विचित्र आवाज काढू लागतो, यानंतर विचित्र पद्धतीने त्याचे शरीर फिरवू लागला, वाकवू लागला. शिक्षकाची ही कृती पाहून मुलांनाही नेमकं काय झाले हे समजले नाही, पण त्याची ही कृती पाहून सर्व जण घाबरले.
हा व्हिडीओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘भाई हा प्रकार कोण करतो?’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘अशा विचित्र वागण्याने मुले घाबरली असावीत.’ अजून एकाने लिहिले, ‘शिक्षकाला भूतबाधा झाली असावी.
शिक्षकाची कृती पाहून घाबरले विद्यार्थी
कुणीतरी लिहिलंय की, शिक्षक मुलांना विज्ञान विषयातील काहीतरी गोष्ट समजावून सांगत असावा किंवा शिकवत असावा, पण कोणीतरी त्याचा अर्धा व्हिडीओ कट करून तो व्हायरल केला, असंही होऊ शकतं. व्हिडीओ शेअर करून एका सोशल मीडिया युजरने दावा केला आहे की, ही महाराष्ट्रातील एका खासगी विद्यापीठातील घटना आहे, पण शिक्षक असे का करत आहे हे स्पष्ट झालेले नाही.
(टीप- ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे लिहिण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये केलेल्या कोणत्याही दाव्याला लोकसत्ता डॉट.कॉम दुजोरा देत नाही.)