Teacher Shocking Video : शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अत्यंत पवित्र असते. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याचे काम शिक्षकांकडून होत असते. विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव ही शिक्षकांकडून करवून दिली जाते. मात्र, काही शिक्षक त्या नात्याला काळिमा फासण्याचे कृत्य करतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत एका शिक्षकावर नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी भरशाळेत शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे.

ही धक्कादायक घटना हमीरपूर जिल्ह्यातील सरिला भागातील एका हायस्कूलमध्ये घडली आहे. संतप्त झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शाळेत घुसून शिक्षकाला चप्पलने बेदम मारहाण केली.

मुकेश चौरसिया असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो कौशांबीचा रहिवासी आहे. तो विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवत होता आणि तिची छेड काढत होता. याबाबत विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली, ज्यानंतर संतापलेल्या तिच्या पालकांनी थेट शाळेत घुसून शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी तुडवले.

मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्षकाविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. हमीरपूरच्या सरकारी शाळेतील शिक्षकाच्या या कृतीवर युजर्सही जोरदार कमेंट करत आहेत. विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, संबंधित शिक्षक त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा, तसेच अश्लील फोटो पाठवण्यास सांगायचा. इतकेच नाही तर तो दिवसभर शाळेतील विद्यार्थिनींकडे टक लावून पाहत बसायचा. अशा वेळी एका विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला; त्यानंतर कुटुंबीयांनी शाळेत घुसून शिक्षकाला बेदम मारहाण केली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दोन व्यक्ती आणि एक विद्यार्थिनी शिक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – PAN 2.0 Apply Online: नवीन पॅन कार्ड काही मिनिटांत येईल तुमच्या ईमेलवर; फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

या घटनेचा व्हिडीओ @VikashSahuftp नावाच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकही संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करत आहेत.