Lucknow school Viral Video: ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे दिवस जाऊन आता शाळांमध्ये हसत-खेळत शिक्षण प्रणाली आहे. शिक्षक हे मुलांचे भविष्य घडविण्याचे काम करतात. कधी ते चांगल्या कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतात; परंतु कधी चुकीची वर्तणूक केल्याबद्दल शिक्षाही देतात. तुम्हालाही तुमच्या शिक्षिकेकडून कधी ना कधी एखाद्या चुकीबद्दल शिक्षा मिळाली असेल. परंतु, काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या चुकीचीही इतकी भयानक शिक्षा देतात की, आपण कधी त्याबाबत विचारही करू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या लखनौमधून समोर आला आहे. त्यामध्ये एका शिक्षिकेने २१ सेकंदांत विद्यार्थ्याच्या सात वेळा कानाखाली मारली आहे. हा मार इतका निर्दयी होता की, त्याच्या कानातून रक्त येऊ लागले. यासंबंधीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

नेमकं काय घडलं?

लखनौमधील ठाकूरगंज पोलीस ठाणे परिसरातील टाऊन हॉल पब्लिक या शाळेतले एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रीती रस्तोगी नावाची शिक्षिका पाचवीच्या विद्यार्थ्याला सतत कानाखाली मारताना दिसत आहे. भरवर्गात शिक्षिका विद्यार्थ्याला पुढे बोलावते आणि त्यानंतर अतिशय निर्दयीपणे या मुलाला मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर मुलाच्या कानातून रक्त आले आणि त्याच रात्री त्याला तापही आला.

शुल्लक कारणावरुन विद्यार्थ्याला निर्दयी मारहाण

या घटनेनंतर कुटुंबीयांनी या प्रकरणी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. ठाकूरगंज पोलीस ठाणे परिसरातील न्यू गंज भागात टाऊन हॉल पब्लिक स्कूल आहे. येथे याच भागातील एक मुलगा इयत्ता पाचवीत शिकतो. मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार यामागचे कारण असे की, इंग्रजीच्या शिक्षिका प्रीती रस्तोगी यांचा वर्ग सुरू होता आणि त्या मुलांच्या असाइनमेंट तपासत होत्या. यावेळी या मुलाच्या वहीत ‘पाणी’ऐवजी ‘ओले’ (wet), असे लिहिलेले होते. त्यावरून शिक्षिका प्रीती रस्तोगी चांगलीच संतापल्या आणि त्यांनी मुलाला मारहाण केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तरुणी बॉयफ्रेंडबरोबर करत होती रोमान्स अन् तेवढ्यात झाली वडिलांची एन्ट्री; VIDEO होतोय तुफान व्हायरल

याबाबत मुलाशी बोलल्यावर मुलाने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर मुलाच्या आईने ११२ या दूरध्वनी क्रमांकावर संंपर्क साधून शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे. तसेच या शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.