आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. मुलंही आपल्या आई-वडिलांचे कष्ट मेहनत पाहत मोठे होतात. या कष्टाची जाणीव ठेवून काही मुलं मेहनत घेतात आणि आई-वडिलांना हातभार लावतात. तर काही मुलांना मात्र आई-वडिलांच्या कष्टाची मेहनतीची जाणीव नसते. अशावेळी ते वेगळ्या दिशेला जातात आणि भरकटतात. दरम्यान याचमुळे चीनमध्ये काही शाळांमध्ये शिक्षक लहान वयातच मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव करुन देतात. शाळेतच त्यांना हे धडे देण्यात येत आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही या उपक्रमाचं कौतुक कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनमधील शाळेतील हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या शाळेत मुलं बसलेली दिसत आहेत. त्यांच्या समोर शिक्षिकेने एका प्रोजेक्टरवर व्हिडीओ लावला आहे. हा व्हिडीओ पाहून वर्गातील प्रत्येक मूल रडत आहे. सुरुवातीला तुम्हालाही प्रश्न पडेल की ही मुलं स्क्रीनकडे पाहून का रडत आहेत. मात्र जस जसा व्हिडीओ पुढे जातोय. तसं याचं नेमकं कारण तुम्हालाही कळेल.

पालकांच्या मेहनतीचे धडे!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मुलांच्या पालकांच्या कामाच्या ठिकाणचे हे व्हिडीओ असून आपले आई-वडिल आपल्यासाठी किती कष्ट करतात हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला आहे. यामध्ये काहींचे पालक खूप मेहनतीचं काम करत आहेत. काहीजण कामाच्या ठिकाणी खूप मळले आहेत, तर काही जणांना जेवायलाही पुरेसा वेळ नाहीय. मुल शिकत असताना, आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव त्यांना व्हावी या उद्देशानं या शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला. आपले पालक बाहेर कष्ट करतात तेव्हा आपण शाळेत शिकू शकतो, आपल्याला जेवण मिळतंय याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/CvY3YeCM3l1/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

हेही वाचा – VIDEO: आईसोबत पोळपाट लाटणं विकायचा, पैशाअभावी लायब्ररीतूनही हकललं; मात्र संघर्षातून आज मुंबई पोलिसात झाला भरती

आज-काल मुलांना पालकांच्या कष्टाची, मेहनतीची जाणीव नसते. सगळ्या गोष्टी सहज मिळत असल्यामुळे मुलांना त्याची किंमत कळत नाही. पालक मात्र मुलांसाठी रात्रीचा दिवस करतात. यामुळे लहान वयातच मुलांना योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher teaches student how there parents work in chine emotional video viral on social media srk