जगात फार कमी लोक असतील ज्यांच्यावर घरच्यांनी अभ्यास करण्यासाठी प्रेशर आणले नसेल. अगदी शाळेत गेल्यापासून ते कॉलेज संपेपर्यंत अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या प्रेशरखाली शिकत असतात. केवळ अभ्यासच नाही, तर परीक्षेत चांगले गुण आणावे अशीही पालकांची इच्छा असते. पण, दोघांमधील कोणतीही गोष्ट जर विद्यार्थी करत नसेल तर त्याची घरच्यांकडून काही खैर नसते. पण, आता कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सोशल मीडियावर अशा एका शिक्षकाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात त्याने परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी एक धासू प्लॅन सांगितला आहे; ज्यातून तुम्ही अभ्यास न करता कसे चांगले गुण मिळवू शकता, हे सांगितले आहे.
प्लॅन मस्त आहे!
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक व्हाइट बोर्डसमोर उभा आहे. यावेळी बोर्डवर काही विषयांची नावे लिहिलेली आहेत. यानंतर शिक्षक त्यांचा मास्टर प्लॅन सांगत आहेत. ते म्हणतायत की, जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या रोल नंबरच्या पुढे आणि मागे असलेल्या विद्यार्थ्याशी मैत्री करा. आता समजा तुमच्या विषयात चार चॅप्टर आहेत, तर एका वि ला दोन चॅप्टर वाचायला सांगा आणि दुसऱ्याला दोन चॅप्टर वाचायला सांगा आणि उरलेले दोन चॅप्टर तुम्ही वाचाल असे सांगा. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागणार नाही आणि तुम्ही पूर्ण गुण मिळवू शकता. अर्थात, असे कोणी करत नसेल, पण हा एक मजेशीर प्लॅन आहे.
हा व्हिडीओ @RVCJ_FB नावाच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, केवळ बॅकबेंचरच अशी आयडिया देऊ शकतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, गुरुदेव, आजपर्यंत तुम्ही कुठे होता? आणखी एका युजरने लिहिले, किती हुशार होत आहेत ना आमच्याकडे? तिसर्या युजरने लिहिले की, समोर आणि मागे दोन्ही लोकांनी तुमचा व्हिडीओ पाहिला आणि कोणीही अभ्यास करून आले नाही तर काय होईल?