शिक्षकाची बदली झाल्याने शाळेतील मुलांनी धाय मोकलून रडत त्यांना निरोप दिल्याच्या तसेच गावकऱ्यांनी बदली झालेल्या शिक्षकाची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील.असाच असचं काहीसं वातावरण पाथर्डी तालुक्यातील जिल्ह परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर येथील शिक्षकांचा निरोप समारंभ पाहून झालं होतं. एका शिक्षकांच्या बदलीने फक्त विद्यार्थीच नव्हे तर गावकरीही रडले, अन् या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, लाडक्या शिक्षकाला निरोप देताना विदयार्थी आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. बारा वर्षांपूर्वी या शाळेत लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. यावेळी या शाळेत फक्त वीस विद्यार्थी येत होते.. ही शाळा ऊसतोड मजूर कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जात होती.. आज या शाळेमध्ये ५४ विद्यार्थी शिकतात.. तब्बल बारा वर्षे त्यांनी या शाळेमध्ये आपली शिक्षक सेवा पूर्ण केली आणि त्यांची १८ मे २०२३ रोजी हनुमान नगर शाळेमधून बदली झाली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – मृत्यूच्या दारातही सोडली नाही जोडीदाराची साथ! Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
आपल्या लाडक्या बोराटे सरांना निरोप देण्यासाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, आजी- माजी विद्यार्थ्यांसह अख्ख गाव लोटले होते. मुलांना भाषण करताना आलेले हुंदके, सरांचे कौतुक करताना सहकाऱ्यांना कोसळलेले रडू अन् गावातील प्रत्येकजण सरांची आठवण सांगून भावूक होताना पाहायला मिळाला.