गेल्या अनेक वर्षांमध्ये आधार कार्डवरील चुकीचे फोटो आणि नावांबाबत विचित्र प्रकरणे समोर आली आहेत, ज्याची माहिती जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एका मुलीचे आधार कार्ड बनवताना मोठी चूक झाली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा मुलीचे वडील तिचे अ‍ॅडमिशन करण्यासाठी प्राथमिक शाळेत पोहोचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे धक्कादायक प्रकरण बदायूं जिल्ह्यातील बिलसी भागातील रायपूर या ग्रामीण भागातील आहे. येथे दिनेश नावाच्या व्यक्तीला पाच मुले असून त्यांची तीन मुले गावातील प्राथमिक शाळेत शिकतात. मात्र, आधार कार्ड तयार झाल्यानंतर दोन वर्षांनी दिनेश आपली मुलगी आरतीला शाळेत दाखल करण्यासाठी शाळेत पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला.

‘सुंदर न दिसणाऱ्या मुलींचीही लग्न लग्न होतात…’; ‘या’ महाविद्यालयात सांगितलं जातंय हुंड्याचं महत्त्व

शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षिकेने आरतीच्या प्रवेशाची सर्व कागदपत्रे तयार करण्यासाठी दिनेशकडे मुलीचे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र म्हणून दिनेशने आपल्या मुलीचे आधारकार्ड दिले. परंतु आधार कार्ड पाहून शिक्षक चक्रावले. आधार कार्डवर दिनेशच्या मुलीचे नाव आरतीऐवजी ‘मधुचे पाचवे मूल’ असे होते.

या घटनेनंतर शिक्षिकेने दिनेशला मुलीचे आधार कार्ड दुरुस्त करून घेण्यास सांगितले. हे प्रकरण जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर, संबंधित आधारकार्ड बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून या चुकीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. याबाबत बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher was shocked to see the name of the girl on the aadhaar card who had come for admission pvp