सध्या सोशल मीडियामुळे अनेक विचित्र आणि धक्कादायक अशा बातम्या झपाट्याने उघडकीस येत असतात. यामध्ये कधी लहान मुलांना शिक्षकांनी केलेली अमानुष मारहण असेल, तर कधी शिक्षकांमध्ये झालेली मारहाण, अशी अनेक प्रकरण सोशल मीडियामुळे लगेच व्हायरल होत असतात. सध्या असंच एक धक्कादायक आणि गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
ती म्हणजे एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीला प्रेमपत्र पाठवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षकाने विद्यार्थिनीला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघडकीस आली आहे. शिवाय “प्रेमपत्र वाचून झालं की फाडून टाक” असंंही शिक्षकाने विद्यार्थ्यांनीला सांगितलं होतं.
हेही वाचा – GST विभागाचा अजब कारभार; बेरोजगार तरुणाला पाठवली १ कोटी ३६ लाखांचा टॅक्स भरण्याची नोटीस
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील कन्नोज येथील आहे. हिवाळी सुट्या लागण्याआधी ३० डिसेंबरला शिक्षकाने विद्यार्थींनाला हे प्रेम पत्र लिहिलं होतं. शाळा सुटल्यानंतर मुलीने घरी जाऊन कुटुंबीयांना शिक्षकाने दिलेल्या पत्राविषयी सांगितलं. घटनेचं गांभीर्य ओळखत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित शिक्षकाविरोधात छेडछाड आणि धमकावल्याची तक्रार दाखल केली.
हेही पाहा- Video:आनंद महिंद्रांना सापडली जगातील सर्वात स्वस्त ट्रेडमिल; म्हणतात ‘हा’ जुगाड यंदाचा सर्वात..
कन्नौजचे एसपी कुंवर अनुपम सिंह यांनी सांगितले की, “पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून शिक्षण विभागाला या घटनेबाबतचा तपास करून पोलिसांना अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.” शिक्षणाधिकारी कौस्तुभ सिंह यांनी सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून, आम्ही पोलिसांना विद्यार्थींनीच्या घरी सापडलेले प्रेमपत्र हे शिक्षकाच्या हस्ताक्षराशी जुळत आहे का? हे तपासण्याची विनंती केली आहे. तपासात आरोप सिद्ध झाल्यास शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यईल”
हेही वाचा- तिकीट दाखवलं नाही म्हणून टीसींची प्रवाशाला लाथा बुक्यांनी मारहाण, धक्कादायक Video व्हायरल
आश्चर्याची बाब म्हणजे या आरोपी शिक्षकाने संपूर्ण प्रकरणावर काहीही भाष्य केलेलं नाही. शिवाय शिक्षक आणि त्याचे कुटुंबीय फरार झाले असून त्याने आपला फोनही बंद करुन ठेवला आहे. दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शिक्षकाचा शोध सुरु केला आहे. तर शिक्षकावरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं कन्नौज शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनुप मिश्रा यांनी म्हटलं आहे.