Teachers dance video: शाळा आणि कॉलेजमधील दिवस हे आयुष्यातील सर्वात चांगले दिवस असतात. या दिवसांमध्ये धमाल मस्ती, मैत्री आणि पहिलंवहिलं प्रेम…एखादा क्रशदेखील असतो. तुमच्या शाळेत तुमचा कोणी क्रश होता का? शाळेत मुलांना एखादी महिला शिक्षिका खूप आवडतं असते. ती टीचर प्रत्येक मुलांची फेव्हरेट असते. काही दिवसांपूर्वी आपण महिला शिक्षकांचा शाळेतील मैदानात आखाडा पाहिला. सध्या सोशल मीडियावर अजून एका शिक्षिकांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या सरांनी शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत असं काही केलं की सर्वत्र त्यांचीच चर्चा होतं आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ गराळा घालत असतात. कधी कोणता व्हिडीओ चर्चेत येईल सांगता येत नाही. यामध्ये अनेक प्रकारचे डान्स व्हिडीओही पहायला मिळतात. अशातच एका शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्था शाळेच्या मैदानात डान्स करताना दिसत आहेत. एका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘आम्ही जातीचे शेतकरी..खातो कष्टाची भाकरी’ या जुन्या मराठी गाण्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भन्नाट डान्स केला आहे. शाळेच्या मैदानावर हे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत डान्स करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशाच सरांनी हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक देखील थिरकले. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sandystorm19 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, एकच नंबर सर, पॉवर ऑफ बिडवे सर अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers dance with students on amhi jatich shetkari song video goes viral on social media srk