Satara teachers dance video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्था शाळेच्या मैदानात डान्स करताना दिसत आहेत. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकही थिरकले

पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशाच साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील शिक्षक मंगेश बिडवे सरांनी हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक देखील थिरकले. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. यावेळी सर्व शिक्षक समोरच्या स्टेजवर उभे असून “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” या गाण्यावर डान्स करत आहे. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“आनंददायी शनिवार”

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत “आनंददायी शनिवार” नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता, यामध्ये दफ्तंराविना शाळा भरवायची असून मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू असल्याचं साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील मंगेश बिडवे सर सांगतात. पुढे ते सांगतात, “कधी कधी आपणही लहान व्हावं,असं प्रत्येकालाच वाटते, पण ती संधी मिळत नाही आणि मिळाली की का बरं सोडावी? शासनाचा उपक्रम रडत रडत न स्वीकारता हसत खेळत स्विकारला पाहिजे. असे उपक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तम आयोजन,उत्कृष्ट सहभाग, सर्वांचा उत्तम प्रतिसाद, भुरळ घालणारा विद्यार्थी प्रतिसाद महत्त्वाचा आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नाईट ड्युटीसाठी निघाला, कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच…; कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mangeshbidve नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, एकच नंबर सर, पॉवर ऑफ बिडवे सर अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers dance with students on nach re mora ambyachya vanat song annasaheb kalyani vidyalaya satara video goes viral on social media srk
Show comments