डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा झाला. शाळेच्या पहिल्या पायरीपासून ते कॉलेजच्या बॅक बेंच पर्यंत सर्वांनाच सर, मॅडम आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिकेत ज्यांनी आपल्याला ज्ञानाचे धडे दिले त्यांचे आभार व्यक्त करण्याचा हा दिवस…पण सकाळपासून सोशल मीडियावर हा दिवस साजरा करणाऱ्या वेगवेगळ्या भन्नाट पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी पोस्टचा आनंद लुटला. विविध पोलीस विभाग आणि ब्रॅण्ड्सनी शेअर केलेल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट तुम्हाला नॉस्टॅल्जिक वाटू शकतात. पहा अशाच काही पोस्ट…
गेले बरेच दिवस आपण ज्या आवाजाला खूप मिस करतोय त्या मुंबई पोलिसांनी एक विनोदी क्रिएटिव्हसह शिक्षक दिनाची पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी काय लिहिलंय ते पहा
View this post on Instagram
फूड कंपनी ‘झोमॅटो’ने त्यांच्या फूडी स्टाईलने शिक्षकांचे आभार मानले आहे. पहा त्यांनी काय लिहिलंय.
View this post on Instagram
नेटफ्लिक्स इंडियाने देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हटके पद्धत वापरली आहे. ‘मनी हाईस्ट’ या लोकप्रिय शोमधील प्रोफेसरने दिलेले धडे शेअर केले आहेत. “बेला बैठ जाओ, प्रोफेसर ज्ञान बाट रहा है.” असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. सोबतच शोमधील प्रोफेसरचा फोटो जोडत त्यांनी आपल्या फिल्मी स्टाइलने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
सुरत शहर वाहतूक पोलीसांनी सर्व शिक्षकांना सलाम करतात शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जे नेहमी आम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे आभार!” असं लिहित सुरत वाहतूक पोलिसांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
अशा भन्नाट पोस्टसह नेटकऱ्यांनी यंदाच्या शिक्षक दिनाचा आनंद लुटला.