Teachers Day 2024 Wishes SMS Quotes : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा खास दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात, ग्रीटिंग्ज किंवा पुष्प गुच्छ देत शिक्षक दिनाच्या त्यांचे दिवशी आभार मानतात. तुम्हाला तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा संदेश पाठवायचे आहे का? आज आपण काही शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही त्यांना व्हॉट्सअप, ग्रीटिंग्ज, मेसेज द्वारे पाठवू शकता किंवा स्टेटसवर ठेवू शकता. जाणून घेऊ या काही हटके शुभेच्छा संदेश.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतात.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

शिक्षक म्हणजेच ज्ञानाचा सागर आणि प्रेरणांचा प्रकाश.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ, जो आमचं जीवन उजळतो.
नकळत विद्यार्थ्यांचे जीवन घडवतो.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा : Pakistan vs Bangladesh Memes : “एक शेजारी खूश तर दुसरा नाराज” सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस, पाहा एकापेक्षा एक भन्नाट मीम्स

Teachers Day 2024 Wishes Quotes SMS whatsapp status in Marathi

जीवनाला नवा आकार आणि
अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक
गुरुवर्यास शतशः प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा दाखवणाऱ्या
शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवु हा पुढे वारसा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Teachers Day 2024 Wishes Quotes SMS whatsapp status in Marathi

शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणाऱ्या लाडक्या शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!

तुमच्यासारखा शिक्षक मिळणे हे आशीर्वादापेक्षा कमी नाही.
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा
जगण्यातून जीवन घडविणारा
तत्त्वातून मूल्ये फुलविणाऱ्या
ज्ञानरूपी गुरुंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

हेही वाचा : गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार! मानवी वस्तीत मगरींचा संचार अन् शिकार; Video पाहून भरेल धडकी, कमेंट्समधून समोर आलं नेमकं ठिकाण

Teachers Day 2024 Wishes Quotes SMS whatsapp status in Marathi

दिले ज्यांनी तुम्हाला भरपूर ज्ञान
त्यांचा करू या आज खास सन्मान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पाच ऑक्टोबरला जगभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers day 2024 wishes in marathi happy teachers day 2024 shishak din wishes sms quotes whatsapp facebook status greetings marathi wishes of teachers day ndj