Viral Video : दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. तर आज सर्वत्र शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तुम्ही शाळेत असताना अनेकदा पाहिले असेल की, काही शाळांमध्ये शिक्षक दिनाची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होते. प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून निवडले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून शिक्षक दिनासाठी सराव करून घेतला जातो. त्यानंतर शिक्षक दिनाच्या दिवशी ड्रेस, साडी, पँट-शर्ट घालून हे विद्यार्थी इतर मुलांना शिकवण्यासाठी वर्गात शिक्षक म्हणून जातात. अशा प्रकारे शिक्षकांसाठी हा दिवस विद्यार्थी आणखीन खास करतात. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सुद्धा असचं काहीसे पहायला मिळाले आहे. शिक्षक दिनानिमित्त तयार झालेल्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो तुम्हाला पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल.
व्हायरल होणार व्हिडीओ एका गावातील शाळेचा आहे. शाळेतील मुले वर्गाबाहेर बसली आहेत. आज त्यांच्या शाळेत शिक्षक दिन साजरा होणार आहे. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, एक व्यक्ती नमस्कार मंडळी ! असे म्हणून व्हिडीओची सुरवात करतो आणि जमलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जे शिक्षक म्हणून तयार झाले आहेत ; त्यांची ओळख करून देतो. शाळेत शिक्षक दिन साजरा करायच्या आधी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात विद्यार्थिनीने शिक्षिकेसारखी साडी नेसली आहे. तर दोन्ही विद्यार्थी शर्ट आणि पँट परिधान करून शिक्षकांसारखे तयार झाले आहेत. तीन विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी मिळून आज शाळेत शिक्षक दिन साजरा करणार आहेत आणि शाळेतील विद्यार्थाना शिकवणार आहेत. शिक्षक दिनाचा हा खास व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाचं…
व्हिडीओ नक्की बघा :
जेव्हा विदयार्थी शिक्षक बनून शाळेत येतात :
कोकणातील मराठी शाळेत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. ज्यात अनेक विद्यार्थी वर्गाबाहेर बसलेले तुम्हाला दिसून येतील. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती एक एक करून शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांची बांदरे सर, लाड सर, जगदाळे बाई अशी ओळख करून देताना दिसत आहे तसेच ते कोणते विषय शिकवणार आहेत हे सुद्धा सांगतो.
तर सोशल मिडीयावरील हा व्हिडीओ @gavmazkokan आणि स्वप्नील कडू यांच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना ‘शिक्षक दिना’ च्या हार्दिक शुभेच्छा असे सुंदर कॅप्शन लिहिलेला व्हिडीओ; अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ बघताचं तुम्हालाही शाळेतील जुने दिवस आठवतील एवढं नक्की..