सोशल मीडियावर शिक्षकांशी संबंधित अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ प्रामाणिक शिक्षकांचे कौतुक करणारे असतात, तर काही व्हिडीओ कामात हालगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांचे असतात. पण सध्या अशा शिक्षकांचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण त्या व्हिडीओमध्ये शिक्षक शाळेतच दारिची पार्टी करताना दिसत आहेत. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील एका गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी दारू आणि कोंबड्याची पार्टी करण्यासाठी शाळाच लवकर सोडली आहे. इतकंच नव्हे तर शिक्षकांनी लाच म्हणून एका मुलाकडून कोंबडीदेखील मागितली होती. कथित पार्टी करणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही घटना बुरहानपूर जिल्ह्यातील सोनूड गावातील प्राथमिक माध्यमिक शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी लाच म्हणून कोंबड्या घेण्यात आल्या होत्या. मागील शुक्रवारी शाळेतील शिक्षकांनी दुपारी ३ वाजता शिक्षकांनी शाळा सोडल्याचा आरोपदेखील विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थी शाळेतून गेल्यावर शिक्षकांनी शाळेतच चिकन बनवून दारू पार्टी केल्याचंही सांगितलं जात आहे.

हेही वाचा- किळसवाणा प्रकार! चक्क नाल्याच्या पाण्यापासून तयार करतायत बर्फ? VIDEO बघून पुन्हा हातही लावणार नाही

गावकऱ्यांचा आरोप –

गावकऱ्यांनी सांगितलं की, दोन मुलांना शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शिक्षकांनी कोंबडा मागितला होता. शाळेत बसून शिक्षक त्याच कोंबडीची पार्टी केली. मिटिंगला जायचे आहे, असं सांगून शिक्षकांनी वर्ग सुरू असताना शाळा लवकर बंद केली होती. यानंतर सर्व विद्यार्थी शाळेतून बाहेर गेल्यानंतर शिक्षकांनी मध्यान्ह भोजन कक्षात बसून दारू आणि चिकन पार्टी केली. तर एका शिक्षकाने दारुच्या नशेत पॅंटमध्येच लघवी केल्याचा दावा एका विद्यार्थीने केला आहे.

शिक्षकांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नवल राठोड, अरुण पांढरे आणि शीखराम पवार हे शाळेत दारू पिताना दिसत होते. या प्रकरणाबाबत बुरहानपूरचे जिल्हाधिकारी भव्या मित्तल यांनी सांगितलं की, “घटनेची माहिती मिळाली असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांची चौकशी करण्यात येईल आणि असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही.”