Female Teachers Fight Viral Video: सोशल मीडियावर दर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत आपण अनेकदा शाळांमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ गाजतोय, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

विद्यार्थी शिक्षकांना गुरूच्या स्थानी मानतात. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका योग्य त्या पद्धतीने दाखवून शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात; पण जर शिक्षकच जेव्हा तशा चुका विद्यार्थ्यांसमोर करतात तेव्हा त्यांच्यावर आपल्या चुकांचा काय दुष्पपरिणाम होईल, याची कित्येकदा त्यांना जराही काळजी नसते. अनेकदा वर्गात मुलांमध्ये मारामारी, भांडणं झालेली आपण पाहिली असतील. अशा मारामारीत शिक्षकच मध्यस्थी करतात आणि भांडणं सोडवतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात विद्यार्थी नाही तर चक्क दोन शिक्षिका भरवर्गात मारामारी करताना दिसतायत.

हेही वाचा… “बायकोचं प्रेम असंच असतं”; भररस्त्यात बायकोने नवऱ्याच्या शर्टावर केलं असं काही की…, VIDEO पाहून व्हाल अवाक

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओत एक शिक्षिका दुसऱ्या शिक्षिकेच्या अंगावरच धावून गेली. खुर्चीवर बसलेल्या एका शिक्षिकेच्या तोंडावर दुसऱ्या शिक्षिकेने हल्ला केला; मग प्रत्युत्तरादाखल त्या खुर्चीवर बसलेल्या शिक्षिकेनेही तिच्यावर
हल्ला केला. या महिला शिक्षिकेंमधली ही मारामारी भरवर्गात सुरू असलेली दिसतेय. यादरम्यान अनेक शिक्षक त्या दोघींची मारामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एका शिक्षिकेचा हात पकडून एक शिक्षक मॅम राहू द्या, नका मारामारी करू असं ओरडत असतो. तुम्हाला माझी शपथ आहे सोडा तिला. तरीही दोघी एकमेकांच्या जीवावर उठलेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो.

हा व्हिडीओ @yadav2398paro या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुलांचं भविष्य धोक्यात! शिक्षिका एकमेकांबरोबर भांडण करतायत”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसंच या व्हिडीओला तब्बल ३.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… दिवाळीआधी ‘ही’ गोष्ट केली नसेल तर लगेच करून घ्या, तरुणाची पुणेरी पाटी होतेय व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ही नक्कीच सरकारी शाळा असणार.” तर दुसऱ्याने, “ज्याने शपथ दिली त्याच्यावरून भांडण होत आहे वाटतं”, अशी कमेंट केली आहे. एक जण कमेंट करत म्हणाला, “याच सरामुळे मारामारी होत असणार.” “या काय मुलांचं भविष्य घडवणार?”, अशीही कमेंट एकाने केली.