आपल्या समाजात शिक्षणाबाबत खूप जागरूकता आहे. लोक अभ्यासाला खूप महत्त्व देतात. जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. काही मुले अभ्यासाच्या बाबतीत खूप हुशार असतात; तर काही विद्यार्थी कमकुवत असतात. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत हवे तसे गुण मिळत नाहीत. कारण- ते अभ्यासच करीत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पालक सतत काळजी करीत असतात. परंतु, अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांना गुण देताना त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काही भन्नाट व मजेदार स्टिकर्स लावताना दिसत आहेत; जे मुलांना प्रेरित करण्यासाठी उपयोगी पडू शकतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गुण देताना त्यांच्या उत्तरपत्रिकांवर मजेदार स्टिकर लावताना दिसत आहेत.
यावेळी ते विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार जसे गुण मिळाले आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या उत्तरपत्रिकांवर स्टिकर लावताना दिसत आहेत. ४५ सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक जण या व्हिडीओतील शिक्षकाचे तोंडभरून कौतुक करीत आहेत; तर अनेक जण हा व्हिडीओ खूप मजेदार असल्याचेही म्हणत आहेत.
हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर TheFigen_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, अनेक जण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “ही एक अतिशय चांगली आयडिया आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “शिक्षकांच्या या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासाकडेही चांगलं लक्ष देतील . परिणामी त्यांना चांगलं जीवन मिळू शकतं.” तर अनेक नेटकऱ्यांनी, मुलांना कळेल अशी भाषा वापरण्याचा या शिक्षकानं प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.