एका शिक्षकच असतो जो मुलांना पुस्तकी ज्ञानाशिवाय बाहेरील जगाचे ज्ञान सांगतो. त्यांना खऱ्या आयुष्य़ातील समस्यांचा सामाना करण्यासाठी ताकद देतो. पुस्तकी ज्ञानासह गरजेचे असते की विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना करता आला पाहिजे आणि स्वत:ला वाचवता आले पाहिजे आणि विद्यार्थांना हे शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका वर्गामध्ये एक शिक्षिका लहान मुलांना आग लागल्यानंतर स्वत:ला कसे वाचवावे हे शिकवते.

हटके पद्धतीने मुलांना शिकवले आग लागल्यावर कसा वाचवाव स्वत:चा जीव

सोशल मीडिया एक्सवर @ViralXfun नावाच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”हा आयुष्याचे ज्ञान देणारा हा धडा आहे जो आपला जीव नक्की वाचवू शकतो.”

fire in thane Diwali
ठाण्यात दिवाळी काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ, चार दिवसांत ३३ ठिकाणी लागली आग
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Success Story Of Nitin Shakya In Marathi
Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
Terrible Acting of Government School Girls
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आलं अंगात; शाळेबाहेर येऊन असं काही करू लागल्या… VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या

हेही वाचा – बापरे! अवघ्या ४ वर्षाच्या चिमुकल्याने चालवली तब्बल १९५ किलो वजनाची Royal Enfield; व्हिडीओ तुफान व्हायरल


व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका वर्गातून काही लहान मुलं आणि एक शिक्षिका दिसत आहे. ही लहान मुले या खोट्या आग आणि धुरातून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे एक प्रात्यक्षिक आहेत जे ज्यामध्ये वर्गात शिक्षिकेने तिथे आग लागल्याचे खोटे वातावरण तयार केले आहे. धूर पसरवलेला आहे. आग दर्शवण्यासाठी आगीचे चित्र असलेले स्टिकर चिटकवले आहे. हे एक प्रात्यक्षिक असले तरी लहानमुलांसाठी हे वातावरण घाबरवणारे असू शकते पण ही मुलं न घाबरता वर्गातून बाहेर पडत आहे. विद्यार्थ्यांची हुशारी आणि प्रसंगवधान यातून दिसून येते.

हेही वाचाभररस्त्यात तरुणीने सुरू केला योगा; धावत्या गाड्यांनी अचानक लावला ब्रेक, इनफ्युएंसरला पोलिसांनी शिकवला धडा

व्हिडीओमध्ये न घबारता मुलं तोंडावर हाथ ठेवून आणि आपले डोके वाकून खोलीतून पळताना दिसत आहे. कारण वर्गात जो धूर पसरलेला आहे तो खोलीच्या वरच्या भागात जास्त आहे आणि खाली एकदम कमी प्रमाणात असतो. त्यामुळे कमी धुरामध्ये विद्यार्थी रांगत किंवा वाकून चालले तर स्वत:चा जीव वाचवू शकतात. ३४ सेंकदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत ४.९ मिलियन लोकांनी पाहिला आहे. जेव्हा ६९ हजारपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, ”कल्पना भन्नाट आहे आणि मुलांना नेहमी लक्षात राहिल.” दुसऱ्याने लिहिले की, ”प्रत्येकाने आपल्या मुलासह याचा सराव केला पाहिजे.” तिसऱ्याने लिहिले की, ”मुलांना जीव वाचवण्यासाठी कौशल्य शिकवणे अत्यंत महत्वाचे असते.”