India vs Pakistan Match funny memes: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आणि मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यासाठी आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरू व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. कारण जो संघ ही मॅच हरेल त्यांच्यासाठी चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास संपल्यातच जमा आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही टीम हा सामना जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत करत आहेत. पण आता मॅचमध्ये काय होईल हे तर काळच ठरवेल. पण दुसरीकडे फॅन्स मंडळी मात्र सोशल मीडियाद्वारे एकमेकांची फिरकी घेत आहेत. भारतीय फॅन्स म्हणताहेत, विजय टीम इंडियाचाच होणार. तर दुसरीकडे पाकिस्तानी फॅन्स सुद्धा पुनरागमनासाठी आपल्या टीमचा उत्साह वाढवताहेत. चला तर मग या पाहूया IND vs PAK मॅचवर व्हायरल होत असलेले काही मजेशीर मीम्स.

दरम्यान, भारत पाकिस्तानविरुद्ध हरू नये अशा शुभेच्छा देत अगदी विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या स्टार खेळाडूंच्या चेहऱ्यावर लिंबू आणि काळे ठिपके असलेल्या भारतीय संघातील इतर सदस्यांचे फोटो टाकले आहेत.अनेक भारतीयांनी वाईटापासून दूर राहण्यासाठी वापरलेला पारंपारिक विश्वास – आणि ‘नजर ना लग जाये’अशा कॅप्शन टाकले आहेत.

आजच्या सामन्याची भारतासह सर्वच क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट फॅन्स खुश असताना दुसरीकडे IIT बाबा मात्र आनंदात मिठाचा खडा टाकण्याचं काम करत आहेत. महाकुंभात स्वत: भोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण केलेले लोकप्रिय आयआयटी बाबा यांनी या सामन्याविषयी मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या या भविष्यवाणीने मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे चाहते चांगलेच भडकले आहेत. 

पाकिस्तान थरथर कापतेय

सगळं लक्ष आजच्या सामन्याकडे

आता वेळ आलीये पाकिस्तानची

भारतीय फॅन्स पाकिस्तानची मजा घेत असून हे व्हायरल मीम्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

Story img Loader