Patali Kamariya Song Viral Video: ‘पतली कमरिया मोरी हाय हाय’ या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तरुणांना वेड लावणारं हे गाणं दिवसेंदिवस लोकप्रीय होताना दिसत आहे. या गाण्यावर तरुणी भन्नाट डान्स करून रील्स इंटरनेटवर व्हायरल करत आहेत. शाळेत भर वर्गात एका शिक्षिकेनं पतली कमरिया गाण्यावर जबरदस्त ठुमक लगावल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. या व्हिडीओची चर्चा सुरु असतानाच आता दुसऱ्या एका तरुणीच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणीने चक्क बुलेटवर ‘पतली कमरिया’ गाण्यावर ठुमके लगावण्याचा प्रयत्न केला. पण गाणं पतली कमरिया होतं पण बुलेटचं वजन खूप असल्याने त्या तरुणीची मोठी फजिती झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पतली कमरीया’ गाण्यावर बुलेटवर डान्स करणं तरुणीला पडलं महागात

नेटकऱ्यांनी सुरु केलेला ट्रेंड पापा की परी पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आला आहे. कारण एका तरुणीला पतली कमरिया मोरे गाण्यावर थिरकरण्याचा मोह आवरला नाही. गाण्याचे बोल सुरु होताच ही तरुणी जबरदस्त ठुमके मारायला सुरुवात करते. पण बुलेटवर बसून डान्स करताना तिची चांगलीच फजिती झाली. कारण तरुणीला डान्स करत असताना बुलेटच्या वजनाचा समतोल राखता न आल्याने तिची फजिती झाली. बुलेटवर बसलेली तरुणी डान्स करत असताना तोल गेल्यावर जमिनीवर खाली पडली. बुलेटवर पतली कमरिया गाण्यावर डान्स करणं या तरुणीला चांगलंच महागात पडलं. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत, कार हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

Upendrakuma1983 नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख व्यूज मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडीओला विनोदी प्रतिक्रियाही देत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “व्यायाम करुनही काही फायदा झाला नाही.”, दुसरा नेटकरी म्हणाला, रील बनवण्याचा नादात स्वत:चच नुकसान करुन घेतलं.” पतली कमरिया गाण्यावर डान्स करण्याची फॅड दिवसेंदिवस वाढली असून सोशल मीडियावर तरुणींच्या डान्सच्या व्हिडीओजला नेटकऱ्यांचा जबरस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पतली कमरिया गाण्याची भुरळ अनेकांना पडली आहे. या गाण्यावर तरुणी जबरदस्त ठुमके लगावताना व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून दिसत आहेत.