Woman Gym Workout Viral Video: माणसाच्या मनगटात ताकद आली की, तो माणूस कधी काय उचलेल, याचा नेम नाही. बाहुबली सिनेमातही अभिनेता प्रभासने मोठी पिंडी उचलून संपूर्ण सिनेविश्वात खळबळ उडवली होती. पण आता एका तरुणीच्या एका व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. चक्क साडी नेसून एक तरुणी व्यायाम करायला व्यायामशाळेत येते आणि सर्वांच्याच भुवया उंचावून जाते. व्यायामशाळेत जिमच्या कॉश्चूममध्ये अनेक तरुण मुलं व्यायाम करताना दिसता. पण एका तरुणीने चक्क साडीवरच जिममध्ये व्यायाम करायला सुरुवात केली अन् भल्या भल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एव्हढच नाही तर तिने चक्क ट्रॅक्टरचा चाकच डोक्यावर उचलून घेत व्यायाम करायला सुरुवात केली. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून इंटरनेटवर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही चक्रावून गेले आहेत.
तरुणीने साडीवरच सर्व प्रकारचा व्यायाम केला, व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले
एक तरुणी साडी नेसून व्यायामशाळेत खतरनाक पद्धतीने व्यायाम करत असल्याचं तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. या तरुणीने संपूर्ण व्यायाम साडीवरच केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्यायाम करताना तिने थेट टॅक्टरचा मोठा चाकच डोक्यावर उचलून घेतला. ही थरारक दृष्य पाहून व्यायामशाळेत व्यायाम करणाऱ्यांना धक्काच बसला. हा व्हिडीओ रिना सिंह नावाच्या या तरुणीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गुलाबी रंगाच्या साडीत तरुणीने केलेला जबरदस्त व्यायाम पाहून जिम ट्रेनरसह अनेकांना घाम फुटल्याशिवाय राहिला नसेल. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर भन्नाट कॅप्शन देत म्हटलंय, “ही तर फक्त सुरुवात आहे.”
चाकाला हवेत उचलून तरुणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला
इथे पाहा व्हिडीओ
साडी नेसलेली तरुणी चाक हातात घेऊन थेट डोक्यावर उचलून घेत स्काट्स मारायला सुरुवात करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला असून आतापर्यंत या व्हिडीओला १६ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर तीन लाखांहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो. मला तुमची ताकद पाहून प्रेरणा मिळते. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “हा फक्त देखावा असून इन्स्टाग्रामवर लाईक मिळवण्यासाठी हे सर्व केलं जात आहे.”