Girls Bicycle Riding Stunts Video : सोशल मीडियावर प्रकाशझोतात यायचं असेल, तर ते एव्हढं सोपं नाहीय. कारण इंटरनेटवर स्टार व्हायला तुमच्याकडे भन्नाट टॅलेंट असला पाहिजे. लोकांच्या हृदयात अधिराज्य गाजवायचं असेल तर चकत्कारीक काहीतरी करावं लागंत. जमिनीवर नुसत्या उड्या मारून चालत नाही, तर चक्क सायकल चालवताना दोरीउड्या माराव्या लागतात. एका तुरुणीचा अशाच प्रकारचा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चक्क सायकल चालवतानाच या तरुणीने अप्रतिम दोरीउड्या मारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोन हात सोडून सायकल चालवताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. पण या तरुणीने दोन हात सोडून सायकल तर चालवलीच आहे, पण याचसोबत दोरीउड्याही मारण्याचं जबरदस्त टॅलेंट जगासमोर आणलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यावरून सायकलसवारी करताना तरुणीने चमत्कारच केला, पाहा व्हिडीओ

तरुणीचा हा व्हिडीओ बुशरा नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. एक तरुणी रस्त्यावरून सायकल सवारी करत असताना दोन्ही हात सोडून दोरीउड्या मारत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मोकळ्या रस्त्यावरून सायकल चालवत दोरीउड्या मारण्याची कसरत करताना ही तरुणी या व्हिडीओत दिसत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, सायकल चालवताना स्वत:चा तोल सावरून तरुणी सहजरित्या दोन्ही हातांनी दोरीउड्या मारताना दिसत आहे. सरावाशिवाय हे शक्य नाही. पहिल्यांदा कुणी असं करायला गेला, तर त्या व्यक्तीला ते नक्कीच अवघड वाटेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं वाटतंय की, या तरुणीने अशा स्टंटबाजीसाठी खूप मेहनत घेतली असावी.

नक्की वाचा – Viral Video : या नवरा-नवरीचा प्री वेडिंग शूट गाजला, नववधूच्या रोमॅंटिक अदांवर नेटकरी झाले फिदा, म्हणाले, ” लग्नानंतर असच….”

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही जणांना वाटलं की, हा व्हिडीओ एडिट केलेला आहे किंवा काहीतरी जुगाड करुन केला असावा. पण हा व्हिडीओ खरा असून तरुणीने तिचं टॅलेंट या व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर आणलं आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावर केला असून हजारोंच्या संख्येत या व्हिडीओला लाईकही मिळत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “तुम्ही जोपर्यंत एक्सपर्ट होत नाहीत, तो पर्यंत असे स्टंट मारण्याचा प्रयत्न करु नका.” या व्हिडीओला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड शेअर केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen girl skipping stunt while riding a bicycle on road viral video on instagram stuns netizens nss