Teen girl dies by suicide on Instagram live: छत्तीसगडमधील जांजगीर येथील एका धक्कादायक घटनेत अंकुर नाथ नावाच्या १९ वर्षीय महिला कंटेंट क्रिएटरचा सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान आत्महत्या करून मृत्यू झाला.

इन्स्टाग्रामवर लाइव्ह असताना तरुणीचा मृत्यू

FPJच्या वृत्तानुसार २९ डिसेंबर रोजी अंकुर इन्स्टाग्रामवर लाइव्ह होती. फोनवरून अनेक फॉलोवर्स तिला पाहत असतानाच तिने गळफास घेतला. असे कळले की, काही फॉलोअर्स तिला वाचवण्यासाठी तिच्या घराकडे धावले, परंतु जेव्हा ते तिच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना ती मृत अवस्थेत आढळली.

nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
Young man commits suicide by shooting himself in Bhandup
भांडुपमध्ये स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

२०+ फॉलोअर्सनी पाहिलं लाइव्ह स्ट्रीमिंग

तिचं इन्स्टाग्राम अकाउंट किंवा व्हिडीओ सापडला नसला तरीही अहवालात असे म्हटले आहे की, ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह होती, जेव्हा तिने गळफास घेतला. असं कळलं की २०+ फॉलोअर्सनी तिचा स्ट्रीमिंग व्हिडीओ पाहिला आणि काही जण चिंतेने तिच्या निवासस्थानी धावले.

अंकुर छत्तीसगडमधील मिसडा गावातील रहिवासी आहे, तर तिचे पालक हैदराबादमध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम करतात.

हेही वाचा… VIDEO: महिलांनो काचेच्या बांगड्या हातातून काढताना तुटतात का? मग ‘ही’ जबरदस्त ट्रीक पाहा, कधीच हाताला बांगडी लागणार नाही

तरुणीच्या आत्महत्येबद्दल कळल्यावर स्थानिकांनी निदर्शनास आणले की, अंकुर तिच्या मोबाइल फोनवर बराच वेळ घालवायची. तिच्या जीवनाचा अंत करण्याच्या निर्णयामागे प्रेमसंबंध किंवा हेटफूल कमेंट्स हे कारण असल्याचा संशय आहे.

पोलिस तपास सुरू आहे

या प्रकरणाचा आता नवागढ पोलिसांकडून तपास केला जात असून, तिचा प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा… हा नाद रक्तात असावा लागतो! चिमुकल्याने जे केलं ते करताना तुम्हीही दोनदा विचार कराल, VIDEO एकदा पाहाच

नवागढ पोलिस ठाण्याचे प्रभारी भास्कर शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सायबर सेलच्या तपासात सुसूत्रता आणण्यासाठी अंकुरचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठवण्यात आला असून, त्यानंतर तो तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Story img Loader