Besharam Rang Song Viral Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांच्या बेशरम रंग गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दीपिकाचा असा बोल्ड अंदाज तु्म्ही याआधी कधी पाहिला नसेल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गाण्याचं वेड तरुणांना लागलेलं दिसतंय. कारण एका तरुणींच्या एका ग्रुपने ‘बेशरम’ रंग या गाण्याचं रिक्रिएशन करुन बोल्ड अंदाजात डान्स केलाय. चित्रपट प्रदर्शीत होण्याआधीच तरुणींच्या या ग्रुपने बोल्ड अंदाजात डान्स करून तमाम नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तरुणींच्या या भन्नाट स्टेप्स पाहून दीपिका पादुकोणच्या स्टेप्सही त्यांच्या डान्ससमोर फिक्या पडतील, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.

तरुणींचा ‘बेशरम रंग’ गाण्यावरचा डान्स इंटरनेटवर गाजला, नेटकरी म्हणाले…

@divyas_choreography नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड गाजल्याने या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तरुणींचा एक डान्स ग्रुप पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ज्याप्रकारे दीपिकाने बेशरम रंग गाण्यावर डान्स केला आहे, तशाच प्रकारच्या स्टेप्स या तरुणी करताना व्हिडीओत दिसत आहेत. पण तरुणींचा हा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिकियांचा वर्षाव या व्हिडीओवर केला आहे. तरुणींच्या अप्रतिम डान्सपुढं दीपिका पादुकोणच्या स्टेप्स फिक्या पडतील, अशा प्रकराच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येताना दिसत आहेत.

इथे पाहा व्हिडीओ


तरुणींच्या डान्सचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, ओह स्वीटहार्ट, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हा डान्स खूप सुंदर आहे, मला डान्स पाहून आनंद झाला.” दरम्यान, सायरा नावाच्या एका मुलीनं बेशरम रंग गाण्याचं लिप्सिंग करुन भन्नाट ठुमके लगावल्याचं व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या तरुणीचा व्हिडीओत बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एक नेटकरी म्हणाला होता, “हे खूप महान आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “या तरुणीसमोर दीपिका फेल”. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवत हर्ट आणि लव्हचे इमोजीही पाठवले होते.

Story img Loader