Besharam Rang Song Viral Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांच्या बेशरम रंग गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दीपिकाचा असा बोल्ड अंदाज तु्म्ही याआधी कधी पाहिला नसेल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गाण्याचं वेड तरुणांना लागलेलं दिसतंय. कारण एका तरुणींच्या एका ग्रुपने ‘बेशरम’ रंग या गाण्याचं रिक्रिएशन करुन बोल्ड अंदाजात डान्स केलाय. चित्रपट प्रदर्शीत होण्याआधीच तरुणींच्या या ग्रुपने बोल्ड अंदाजात डान्स करून तमाम नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तरुणींच्या या भन्नाट स्टेप्स पाहून दीपिका पादुकोणच्या स्टेप्सही त्यांच्या डान्ससमोर फिक्या पडतील, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा