जगात प्रेमासारखी दुसरी कोणतीही भावना नाही असे म्हणतात. प्रत्येकजण आयुष्यात प्रेम शोधण्यासाठी धडपडत असतात. कधीकधी व्यक्तीला त्यांचे प्रेम सापडते, मात्र त्यांना ते टिकवून ठेवता येत नाही. अशावेळेस व्यक्ती दुःखी होतात. मात्र, काही जण इतके वेड्यासारखे प्रेम करतात की त्यांना अक्षरशः ‘प्रेमाचा आजार’ जडतो. असे म्हणण्यासाठी चीनमधील एक तरुणी कारणीभूत ठरली आहे.

झिओयू [Xiaoyu] नामक तरुणीचे वागणे हे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच चिंताजनक असल्याचे चेंगडूच्या, फोर्थ हॉस्पिटलमधील [Fourth People’s Hospital of Chengdu] डू ना [Du Na] नावाच्या डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती, साऊथ चायना मॉर्निंगच्या अहवालानुसार समजते. नेमके हे प्रकरण काय आहे, तसेच डॉक्टरांनी तरुणीला कोणता आजार असल्याचे निदान केले हे पाहू.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

हेही वाचा : चित्रातील मोनालिसा बनली रॅप गायिका! पाहा मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ App ची कमाल; Video होतोय व्हायरल….

साऊथ चायना मॉर्निंगनुसार, चीनमधील सिचुआन [Sichuan] भागात राहणाऱ्या शिओयूचे तिच्या प्रियकराबरोबर अगदी गहिरे नाते निर्माण झाले होते. ती तिच्या प्रियकरावर प्रचंड प्रमाणात अवलंबून राहू लागली होती. तिला तो कायम तिच्या अवतीभोवती असावा असे वाटू लागले होते. इतकेच नाही तर तो दिवसभर काय करत असतो, याबद्दल सतत माहिती द्यावी; दिवसा किंवा रात्री-अपरात्री कधीही तिच्या मेसेजला उत्तर द्यावी अशी तिची अपेक्षा होती.

अर्थातच, या सगळ्याचा त्रास त्या तरुणीच्या प्रियकराला होऊ लागला होता. इतकेच नाही तर शिओयू प्रियकराला दिवसातून १०० वेळा मेसेज करतानाचा आणि तिच्या प्रियकराने कोणत्याही मेसेजला उत्तर दिले नाही म्हणून शेवटी त्याला व्हिडीओ कॉल केला असल्याचा व्हिडीओदेखील मध्यंतरी व्हायरल झाला होता, असे न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. मात्र, तो व्हायरल व्हिडीओ सध्या कुठेही उपलब्ध नाही असे दिसते.

आपल्या मेसेजला प्रियकराने कोणतेही उत्तर दिले नाही म्हणून शिओयू प्रचंड अस्वस्थ झाली. परिणामी तिने घरातील वस्तूंची तोडफोड केली. तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या प्रियकराने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस तिथे आले असता, तिने घरातील बाल्कनीतून उडी मारण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी वेळीच तिला आपल्या ताब्यात घेतले आणि हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे डॉक्टरांनी शिओयूला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचे सांगितले, ज्याला सामान्य भाषेत ‘लव्ह ब्रेन’ असे म्हटले जाते.

हेही वाचा : “मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स

लव्ह ब्रेन हा विकार तणाव, चिंता, नैराश्य, बायपोलार यांसारख्या इतर मानसिक आजारांसहदेखील एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो. असे होण्यामागचे कारण मुलांचे त्यांच्या बालपणी, त्यांच्या पालकांसह चांगले संबंध नसल्याचे एक लक्षण असू शकते, असे तज्ज्ञ सांगत असल्याचेही साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात म्हटले गेले आहे.

एखाद्या व्यक्तीला हा विकार अगदी सौम्य प्रमाणात असल्यास, भावनांवर नियंत्रण कसे करायचे हे शिकून त्या विकारावर ती व्यक्ती स्वतः इलाज करू शकते. मात्र, विकाराची तीव्रता अधिक असल्यास, व्यक्तीला डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक असते, असेही तज्ज्ञांनी सांगितल्याचे अहवालातून समजते.