दारुचे व्यसन सगळ्यात वाईट. हे व्यसन एकदा लागले की सोडणे कठीणच. दारूपायी लोक काय काय करतील याचा नेमच नाही. आता एका अल्पवयीन मुलाने केवळ दारू मिळावी यासाठी चक्क बाईचा वेश धारण केला. या मुलाच्या बायकी वेशातले फोटो तुफान व्हायरल झाले आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. याँग आझ नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या मित्राने दारू मिळवण्यासाठी हा वेश धारण केला. त्या मुलाचे नाव मात्र समजू शकले नाही. पण या मुलाने दारू मिळवण्यासाठी आपल्या आईचे ओळखपत्र घेतले. या ओळखपत्रावर आपल्याला काही दारू मिळणार नाही हे त्याला चांगलेच ठाऊक होते त्यामुळे त्याने शक्कल लढवली. आपल्या आईसारखे अगदी हुबेहुब वेशांतर त्याने केले. हे वेशांतर इतके अचूक होते की ओळखपत्रावर असणारा आईचा फोटो आणि तो अगदी तसाच दिसत होता. त्यामुळे त्याला कोणीही ओळखू शकले नाही. याचाच फायदा घेत त्याने दारु विकत घेतली. कोणाला कळू नये यासाठी त्याने आईसारखेच कपडे घातले होते. इतकेच नाही तर ओठांवर लिपस्टीक देखील लावली होती. निळा जॅकेट, गळ्यात मफलर, टोपी घातलेला त्याचा फोटो व्हायरल झाला असून जवळपास २२ हजारांहूनही अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. ब्रिटनमधला हा प्रकार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा