या महिन्यात अॅपलने आपला ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७’ प्लस लाँच केला. भारतात हा फोन येण्यासाठी अजूनही एक महिन्याचा अवधी असला तरी काही देशांत तो लाँच करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातही अॅपलची विक्री सुरु झाली आहे आणि त्या देशातील अॅपल प्रेमी तिथे चक्क रांग लावून अॅपलची खरेदी करत आहेत. अॅपल आयफोनसाठी काही लोक इतके वेड झाले की तासन् तास ते रांगेत उभे आहे. यातच रांगेत उभे राहून अॅपल फोन खरेदी करणा-या एका अॅपलवेड्याची सध्या सोशल मीडियावर खूच चर्चा होत आहे.
गेल्याच आठवड्यात ७ देशांमध्ये अॅपलने ‘आयफोन ७’ लाँच केला. या सात देशांमध्ये ऑस्ट्रेलिया देखील एक आहे. तेव्हा नव्या आयफोनच्या खरेदीसाठी १६ वर्षाचा मार्कस एक दोन तास नाही तर तब्बल ३० तास रांगेत उभा राहिला. ही रांग सोडण्यासाठी त्याला एकाने जवळपास १ लाख २५ हजारांची ऑफर दिली पण अॅपलच्या प्रेमापोटी त्यांनी ती ऑफर देखील धुडकावून लावली. चीनच्या एका सरकारी वृत्तसंस्थेने यासंबधीचे वृत्त प्रकाशीत केल्यानंतर सोशल मीडियावर यामुलाची चर्चा रंगली.
‘मी आणि माझे चार मित्र गेल्या तीस तासांहून अधिक काळ अॅपल फोनच्या खरेदीसाठी ३० तासांहून अधिक काळ रांगेत उभे होतो त्याचवेळी आम्हाला सव्वा लाखांची ऑफर आली पण आम्ही ती तिथल्या तिथे धुडकावून लागली’ अशी माहिती मार्कसने दिली. इतकेच नाही तर सकाळपासून सगळ्यांच्या आधी त्याने येऊन दुकानाच्या बाहेर लाईन लावली होती. सिडनीच्या एका दुकानाबाहेर भर पावसात देखील तासन् तास अॅपलच्या फोनसाठी काही लोक उभे असल्याचा आणखी एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा