Tejashwi Yadav Claimed To Be Drunk in This Video: लाइटहाऊस जर्नलिझमला आरजेडी नेते तेजस्वी प्रसाद यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. मीडियाशी बोलत असताना तेजस्वी यादव मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा या व्हिडीओसह करण्यात आला होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की तेजस्वी यादव मद्यधुंद अवस्थेत असल्याचे भासवण्यासाठी व्हायरल व्हिडीओमध्ये जाणूनबुजून काही बदल करण्यात आले आहेत, नेमकं मूळ व्हिडिओमध्ये ते काय म्हणतात व व्हायरल होणारा दावा काय आहे हे पाहूया. जाणून घ्या सत्य

काय आहे दावा?

X यूजर @Gorakhpurwale ने व्हायरल व्हिडीओ खोट्या दाव्यासह आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर युजर्सनीही व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

तपास:

तपासाच्या सुरुवातीला आमच्या लक्षात आले की व्हिडीओवरील लोगो हा रिपब्लिक भारतचा होता. त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून काही कीफ्रेम घेतल्या आणि गूगल रिव्हर्स इमेज सर्च वर शोध सुरु केला. यातून आम्हाला तेजस्वी यादव यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले.

आम्हाला तोच व्हिडीओ The Statesman X हॅण्डलवर पोस्ट केलेला आढळला. तेजस्वी यादव यांनी बिहारच्या नेत्यांना मिळालेल्या मंत्रिमंडळातील खात्यांवरून पंतप्रधान मोदींवर ताशेरे ओढले, असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे.

आम्हाला वृत्तसंस्थांच्या इतर अनेक प्रोफाइलवर व्हिडीओ सापडला.

रिपब्लिक भारत या चॅनलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सुद्धा अखेरीस आमच्या समोर आला.

युट्युबवर अपलोड केलेला शॉर्ट फक्त ३० सेकंदांचा होता, तर जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात होता, तो मात्र ४३ सेकंदांचा होता, ज्यामुळे व्हिडिओचा वेग मंदावला आहे, हे स्पष्ट लक्षात आले.

हे ही वाचा<< Video: मशिदीबाहेर जमावाला पोलिसांकडून मारहाण? लोकांनी घेतली पोलिसांचीच बाजू, म्हणाले, “दहशतवादाचे..” (Fact Check)

निष्कर्ष: तेजस्वी यादव यांचा एडिट केलेला व्हिडीओ, जिथे त्यांच्या संभाषणाची गती संथ करण्यात आला आहे, तोच व्हिडीओ तेजस्वी यादव मद्यधुंद होते असा अशा दाव्यासह व्हायरल केला जात आहे. व्हायरल व्हिडीओ खोटा आहे.