Heart Attack on Palm Tree Video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. अभिनेता श्रेयस तळपदेलाही काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहेत. याच दरम्यान तेलंगणाच्या भुवनगिरी येथे अशीच एक दुःखद घटना घडली आहे. याठिकाणी ताडाच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेतून कधी काय होईल याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तामिळनाडूमधील एका गावात नारळाच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. नीरा काढण्यासाठी एक व्यक्ती नारळाच्या झाडावर चढला होता. झाडावर असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच लटकला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अधांतरी लटकलेल्या व्यक्तीला खाली उतरवले. हा व्यक्ती नेहमीप्रमाणे ताडाच्या झाडावर चढला होता यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. लक्ष्मय्या असे मृत व्यक्तीचे नाव असून ते राजन्नागुडेम गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती निरा मिळविण्यासाठी ताडाच्या झाडावर चढला होता. मात्र तो झाडावर असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा
यावेळी घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना ताडाच्या झाडावर लक्ष्मय्या मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर मृतदेह खाली आणण्यासाठी क्रेन आणण्यात आली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती क्रेनच्या हुकला बांधून मृतदेह झाडावरून खाली काढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका कशामुळे आला हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरु आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> किली पॉललाही यायचंय अयोध्येत; ‘राम सिया राम’ भजन गाऊन केली इच्छा व्यक्त, VIDEO होतोय व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.