Shocking video: प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. तर काही असे ही लोक असतात जे प्रेमाला खेळ समजतात. सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे. जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर एका मुलीने तिच्या तरुणाला नकार दिल्याने तो इतका संतापला की त्याने तिला भयानक शिक्षा दिली. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. ज्याने प्रेम केलं आहे. तोच ही भावना समजू शकतो, ज्यावर आपण अतोनात प्रेम केलं, ज्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्न रंगवली. तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो तेव्हा सगळं संपलं बस्स…आता जगायचं नाही असंच काहीस वाटतं… पण काही लोक तर गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात. ते बदला घेण्याची मानसिकता ठेवतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे.
ही धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने दिवसाढवळ्या बुरखा घातलेल्या महिलेवर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून देण्याची धमकी दिली. राज्यातील हुजूरनगर भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या व्यक्तीने महिलेवर ज्वलनशील द्रव फेकल्याचे दृश्य रेकॉर्ड केले आहे. त्यात तो माणूस स्वत:वर पेट्रोल ओतून रस्त्यावर गोंधळ घालत असल्याचेही दिसून आले. स्थानिकांनी मध्यस्थी करून या व्यक्तीला त्याच्या या वागणुकीसाठी चोप दिला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण आणि दोन बुरखा घातलेल्या स्त्रिया रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसत आहेत. यावेळी हा तरुण त्यांच्यापैकी दोघांशी बोलताना दिसतोय. यावेळी तो त्यातल्या एका महिलेला तुझं माझ्यावर प्रेम का नाही सांग असं विचारत आहे. यावेळी महिलेनं नकार दिल्यानंतर चिडलेल्या तरुणानं तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला सार्वजनिकरित्या जिवंत जाळण्याची धमकी दिली. पुढे तो स्वत:च्याही अंगावर पेट्रोल टाकताना दिसत आहे. यावेळी आजूबाजूचे लोक गोळा झाले आणि तरुणाला बाजूला घेऊन जात चोप दिला.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/jsuryareddy/status/1889354425879384152
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jsuryareddy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. महिलेने हुजूरनगर पोलिसात सुंदर प्रमोद नावाच्या गुन्हेगाराविरुद्ध तक्रार नोंदवली, ज्याने तिला पेटवून “खून” करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात आता पोलीस पुढील तपास करत आहेत.