Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यात नवनवीन चित्रपटांमधील चर्चेत असलेली गाणी, डान्स स्टेप्स, डायलॉग यांवर अनेक जण रील्स बनवताना दिसतात. सध्या सगळीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट खूप चर्चेत असून यामध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. शिवाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण भावूक झाले, ज्याचे विविध व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, आता चित्रपटगृहातील एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही शाळेतील विद्यार्थी चित्रपटगृहात शिवगर्जना म्हणताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच शिवजयंती पार पडली. शिवजयंतीनिमित्त अनेक शाळा, कॉलेजांमध्ये वेशभूषा करून शिवाजी महाराजांवर आधारित गाणी, नृत्य, अभिनय करून हा दिवस साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त तेलंगणामधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनाही हा चित्रपट दाखवण्यात आला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘छावा’ चित्रपट संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थी आपल्या छातीवर हात ठेवून मोठ्या आवाजात शिवगर्जना म्हणायला सुरुवात करतात. त्यांच्या शिवगर्जनेने संपूर्ण चित्रपटगृह हादरून निघतो. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “कामारेड्डी येथील थिएटरमध्ये #छावा चित्रपट पाहणारे सरस्वती शिशुमंदिरचे विद्यार्थी. हा #छावा चित्रपट प्रत्येक गावात दाखवावा”, असं लिहिण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @madhu_patel_patriot या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “शाळेच्या मुख्याध्यापकांना सलाम” दुसऱ्यानं लिहिलंय, “या शाळेचं नाव काय? मला पण माझ्या मुलाला या शाळेत घालायचे आहे.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “तेलंगणाशी संभाजी महाराजांचे खास नाते आहे.”