Telangana snake Video: दारुचा मोह अनेक माणसाला असतो. ज्यामुळे माणूस कधीकधी अडचणीत सापडतो. शिवाय हे शरीरासाठी देखील हानिकारक आहे. पण जेव्हा एका मुक्या प्राण्यानेही दारुचा मोह केला, तेव्हा तो देखील संकटात सापडला आहे. मोह हा नेहमीच अडचणीचा ठरत असतो याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये बिअरच्या कॅनमध्ये चक्क एका सापाचं तोडं अडकलं. मात्र त्याची दुसरी बाजू अशी की, निसर्गाचं चक्र माणसामुळे कसं विस्कळीत होते, याची प्रचिती येते.
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे, इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. वन्यप्राणी आणि त्यांची जीवनशैली पाहण्याची उत्सुकता कायमच नेटकऱ्यांना असते. त्याच थरारक व्हिडीओंना नेटकऱ्यांनी पसंती असते. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. तरुण मंडळी एनर्जी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिताना दिसतात. त्यातही तरुणां प्लास्टिक बाटल्यांपेक्षा अॅल्युमिनियमच्या डब्यात प्यायला आवडते. मात्र डब्बे रिते केल्यानंतर कचराकुंडीत फेकण्याऐवजी इतरत्र फेकून दिले जातात. मात्र ही कृती वन्य प्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे.
बियरच्या कॅनमध्ये अडकलं सापाचं डोकं
आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा अंगावर शहारा येतो. आता हाच व्हिडीओ पाहा ना, बियर पिऊन झाल्यावर रिकामं कॅन कोणीतरी रस्त्यावर फेकलं होतं. या कॅनमध्ये चक्क एका सापाचं तोडं अडकलं. हा साप बराच वेळ आपलं तोंड बाहेर काढण्यासाठी झटपटत होता. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
तेलंगणामधील नालगोंडा येथील घटना
तेलंगणामधील नालगोंडा या ठिकाणी ही घटना घडली आहे. एक साप पाण्याच्या शोधात फिरत असताना त्याला रस्त्यावर पडलेलं हे बियरचं कॅन दिसलं. पाणी मिळवण्याच्या आशेने तो साप कॅनमध्ये शिरला. पण त्याला पाणी काही मिळालं नाही. उलट त्याचं डोकंच कॅनमध्ये अडकलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओमध्ये एक साप दिसत आहे. बिअरच्या कॅनमध्ये डोकं अडकल्यामुळे अस्वस्थ झाला आहे. व्हिडीओमध्ये साप कॅनमधून बाहेर येण्यासाठी तळमळताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “लग्न ही अशी जखम…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल
शेवटी काय झालं?
हा साप जवळजवळ तीन तास डोकं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता, शेवटी बऱ्याच प्रयत्नानं सापानं स्वत:च त्याचं डोके बाहेर काढलं.