सर्वोत्कृष्ट साड्यांबद्दल बोलायचे झाले तर पैठणीपासून बनारसी साडीचा उल्लेख नक्कीच येतो. या साड्या सुंदर डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतातही एकापेक्षा जास्त साड्या मिळतात. कांजीवरम आणि सिल्क साडी ही त्यापैकी एक आहे. या साड्यांना जगभरात मागणी आहे. तुम्हाला अशाच एका सिल्क साडीबद्दल सांगणार आहोत, जी आगपेटीत बसू शकते. ही साडी हैदराबादच्या सिरसिल्ला जिल्ह्यातील नल्ला विजय यांनी बनवली आहे. या साडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने साडीची मागणी वाढली आहे. ही साडी तेलंगणाचे मुख्यमंत्री केटी रामाराव यांच्यासह अनेक मंत्र्यांना दाखवण्यात आली.
ही साडी शुद्ध रेशमाची असून अत्यंत बारीक कातल्यामुळे आगपेटीत बसू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही साडी बनवून ती आगपेटीत पॅक करण्यासाठी सहा दिवस लागतात. ही साडी मशिनद्वारे बनवण्यासाठी ८ हजार रुपये लागतात, तर हाताने बनवण्यासाठी १२ हजार रुपये खर्च येतो, असे कारागिरांचे म्हणणे आहे.
२०१५ मध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी देखील त्यांना अशाच प्रकारची सुपर फाइन सिल्क साडी भेट देण्यात आली होती. भारतात साड्यांना मोठा इतिहास आहे. शतकानुशतके भारतात साडी नेसण्याचा ट्रेंड आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान करण्याचा ट्रेंड आहे. त्यापैकी सिल्क साडी ही अशीच एक साडी आहे जी संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात पसंत केली जाते. ११ जानेवारी रोजी शेअर केलेल्या पोस्टला हजारो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. लोकं विणकर नाल्ला विजयची स्तुती करत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केले, “महान प्रतिभा,” दुसऱ्याने लिहिले, “नमस्कार भाऊ,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “विजय, तुमची स्वप्ने पूर्ण होतील अशी आशा आहे!”