रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना तुमची एक चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते. हे सर्व माहीत असूनही अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून उद्यानात चालत असल्यासारखे रस्त्यावरून चालत असतात. रस्त्यावरील अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, अनेकदा लोकांचे नशीब त्यांना त्यावेळी साथ देते, त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने हे सिद्ध केले आहे की, तुम्ही रस्त्यावर जितके सावध राहाल तितके कमी आहे. अपघात दरम्यान आलेले अनुभव कधी जीवनाचा चांगलाच धडा देतात. आता ही क्लिपच बघा, एक कार ऑटोला धडकते आणि मध्येच एक महिला येते. हा अपघात पाहून महिलेचा जीव वाचेल असे वाटत नाही, मात्र नशीब या अपघातातून महिलेला वाचवते.

( हे ही वाचा: स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!)

येथे पहा रस्ता अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ

अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला रस्त्यावरून जात आहे, त्याचवेळी एक बेकायदेशीर कार येऊन तिथे उभ्या असलेल्या ऑटोला धडकते. या अपघातात कार आणि ऑटो या दोन्हीच्या मधोमध एक महिला असून ती दोन्ही वेगवेगळ्या बाजूने पडल्याने महिला त्या दोघांमधून बाहेर पडते आणि तिचा जीव थोडक्यात वाचतो.

( हे ही वाचा: पायाला स्पर्श करताच गणपती बाप्पाने स्वतः उभं राहून दिला आशीर्वाद; पाहा Viral Video)

ही धक्कादायक क्लिप तेलंगणाचे एडीजीपी व्हीसी सज्जनार यांनी ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. या व्हिडीओला ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं असून कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या कारवाल्यावर कडक कारवाई व्हायला हवी.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नये.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader