लखनऊमधल्या काली माता मंदिरातील काली मातेच्या मुर्तीला चक्क लोकरीच्या उबदार वस्त्रांनी झाकण्यात आले आहे. तापमानात घट होत आहे, म्हणून देवींच्या मुर्तींवर लोकरी वस्त्र चढवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

उत्तरेकडील अनेक राज्यात गेल्या आठवड्यापासूनच कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळे अनेक ठिकाणाचे तापमान हे १५ अंश सेल्शिअसच्याही खाली आहे. काही ठिकाणी हे तापमान ५ अंश सेल्शिअसच्या आसपास आहे. उत्तर प्रदेशमधेही थंडीची लाट आहे. अनेक भागांत दिवसाही तापमान १० अंश सेल्शिअसच्या खाली आहे. अशात उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथेही गुलाबी थंडीचे वारे वाहत आहे. पुढचा आठवडाभर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये तापमानात अधिक घट होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. लोक लोकरीची चादर आणि शेकोडी पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहे. अशातच लखनऊमधल्या प्रसिद्ध अशा काली मंदिरात देवीला थंडीपासून वाचवण्यासाठी लोकरची वस्त्रे चढवली आहेत. तापमानत घट होत आहे, त्यामुळे मंदिर प्रशासनांनी देवीवर लोकरीपासून विणलेली ओढणी आणि इतर उबदार वस्त्रे चढवली आहेत. या मंदिरात असणा-या सिद्धीदात्री, महागौरी, कालदात्री, शैलपुत्री देवींच्या मुर्त्यांना देखील लोकरीची उबदार वस्त्रे चढवण्यात आली आहेत.

गेल्या आठड्यापासून काश्मीरमध्येही गुलाबी थंडीची लाट पसरली आहे. दोन दिवसांपासून काश्मीर खो-यातील तापमानाचा पारा खाली उतरत आहे. त्यामुळे सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे. येथील तापमान इतके खाली उतरले आहे की पीर पंजाल घाटातील धबधबा देखील गोठून गेला आहे. तापमानात झालेली घट आणि बर्फवृष्टी यामुळे रजौरीमधला धबधबा देखील गोठलेला पाहायला मिळाला. रजौरी हा भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे अनेक छोटी मोठे तलाव आहेत. परंतु दोन दिवसांपासून तापमान घटत असल्याने येथील धबधबा देखील गोठून गेला आहे.

Story img Loader