Temple Demolished Viral Video: लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडीओ आढळून आला. २५ सेकेंदांच्या क्लिपमध्ये एक व्यक्ती प्रवेशद्वारासारखे बांधकाम पाडताना दिसत आहे. व्हिडीओसह असा दावा करण्यात आला होता की, व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मुस्लिम असून ती मंदिराचे बांधकाम तोडत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या कृतीचं सत्य काय आहे? हे आपण पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर @rajasolanki71070 ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला होता.
इतर सोशल मीडिया वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून अनेक कीफ्रेम मिळवल्या व आमचा तपास सुरू केला. कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालू असताना आम्हाला इंडिया टुडेच्या वेबसाइटवर एक बातमी सापडली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये अपलोड केलेल्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडीओप्रमाणेच कीफ्रेम्स होत्या.
रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: आंध्र प्रदेशातील गुंटूर या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी एक दर्गा पाडण्यात आला. त्यानंतर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुंटूरमधील एलबी नगर येथे १२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. काही लोकांनी हातोड्याचा वापर करून दर्गा पाडण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिकांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखले होते.
अहवालात नमूद केले आहे: लालपेट पोलिस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, “बाजी बाबा दर्ग्याची स्थापना एएस रत्नम उर्फ रहमानने केली होती जो मागील ४० वर्षांपासून या भागात राहत आहे. १५ वर्षांपूर्वी याच जमिनीत त्यांनी पत्नीची समाधी उभारली व आपल्या मुलीला आणि शेजाऱ्यांना त्याच्या मृत्यूनंतर तिथेच मशीद बांधण्यास सांगितले होते.
हे ही वाचा<< रडून, हात जोडून दयेची याचना करणाऱ्या कुटुंबावर हल्ला? Video मुळे हिंदू- मुस्लिम वादाची ठिणगी पेटली, पाहा खरं काय
भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवहर यांनीही एक दर्गा उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सांगत हा व्हायरल व्हिडीओ त्यांच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.
आम्हाला आणखी एक पोस्ट सापडली ज्यामध्ये एक दर्गा पाडण्यात आल्याचे म्हटले होते.
आम्हाला झी न्यूजच्या वेबसाइटवर आणखी एक बातमी सापडली.
रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: गुंटूरमधील दर्गा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दर्गा पाडण्यास लोक विरोध करत असून त्या निषेधाला भाजपानेही जोरदार समर्थन दिले आहे. दर्गा पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपींमध्ये मुस्लिमांचाच समावेश आहे.
हे ही वाचा<< हिंदू साध्वीचा मुस्लीम पुरुषाशी विवाह? Viral फोटोमध्ये दिसणारे हे चेहरे कोण? अखेर सत्य आलं समोर
निष्कर्ष: गुंटूरमध्ये मशीद बांधण्यासाठी दर्गा तोडल्याचा जुना व्हिडीओ मुस्लिमांनी मंदिर तोडले आहे अश्या खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.