सरकारी रुग्णालयात जवळपास एक वर्षांपासून डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीचा पर्दाफाश झाला आहे. ही तरुणी बनावट डिग्रीच्या आधारे जवळपास एक वर्षापासून रुग्णालयात कार्यरत होती. धक्कादायक बाब म्हणजे बोगस डॉक्टर म्हणून काम करणारी ही तरुणी केवळ दहावी पास आहे. अनेकवेळा काही नोकरी मिळत नसल्याने अनेकजण बनावट कागपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात.

फसवणूक करुन नोकरी मिळवणाऱ्यांची उदाहरण याआधीही आपण ऐकली असतील. पण केवळ दहावी पास असताना डॉक्टर म्हणून सरकारी दवाखान्यात कामं करणारी तरुणी ही बोगस डॉक्टर असल्याचं उघड झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.

Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Bogus woman doctor arrested in Gowandi
गोवंडीत बोगस महिला डॉक्टरला अटक
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद

हेही पाहा- Viral Video: हजारो लोकांसमोर लाइव्ह सूरु असताना कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, बळजबरीने जवळ ओढलं अन्…

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना तुर्कीमधील असून आयसे ओझकिराझ असं बोगस डॉक्टरचं नाव आहे. ती राजधानी इस्तंबूलपासून १०० किमी. अंतरावर असलेल्या Çerkezköy येथील सरकारी रुग्णालयात मागील एक वर्षापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होती. मात्र, काही दिवसांपुर्वी तिच्या चुकीच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तिच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी ओझकिराझची चौकशी केली असता, तिच्याकडे डॉक्टर म्हणून काम करण्यायोग्य कसलीही वैद्यकीय पात्रता नसल्याचं समोर आलं. शिवाय तिने कामावर रुजू होताना जमा केलेली सर्व कागदपत्रं बनावट असल्याचंही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना समजलं.

हेही वाचा- महिला शिक्षिकेकडून तब्बल कोटींची संपत्ती हनुमान मंदिराला दान; मुलं आणि पती नाराज

दरम्यान, ओझकिराझने इस्तंबूल विद्यापीठाच्या कॅपा मेडिकल कॉलेजमधून वैदकीय शिक्षण पुर्ण केल्याचा दावा केला होता. मात्र, तिला कॉलेज आणि अभ्यासक्रमाविषयी काही प्रश्न विचारले असता तिने उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे रुग्णालयातील वरिष्ठांना तिच्यावर जास्त संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी ओझकिराझचीही चौकशी केल्यानंतर तिच्या घराची झडती घेतली. त्यावेळी तिच्या घरातून अनेक बनावट ओळखपत्र आणि डिप्लोमा सर्टिफिकेट सापडली आहेत. शिवाय तिची वैद्यकीय पदवीही बनावट असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरातून सर्जिकल कपडेही जप्त केली.

दरम्यान, केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या ओझकिराझने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, “दहावीत असल्यापासून मी डॉक्टर व्हावं अशी माझ्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्याचा माझ्यावर खूप विश्वास होता. मला चांगले गुण मिळतील असे त्यांना वाटत होते, पण मी परीक्षेत नापास झाले आणि बनावट कागदपत्रे तयार करून ती माझ्या कुटुंबीयांना दाखवली.” असं सांगत ओझकिराझने गुन्हा कबुल केला.