बाईक असो वा कार कोणतेही वाहन चालवताना वातुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. शिवाय वाहनं चालवताना आपल्याकडून थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर त्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतात. सोशल मीडियावर वाहनांच्या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही अपघात समोरच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालेले असतात तर काही आपल्या चुकीमुळे झालेले असतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कारचा दरवाजा उघडतानाचा आपला छोटासा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचं उदाहरण पाहायला मिळत आहे.

आपण आपल्या कारचा दरवाचा अनेकदा मागे न पाहता उघडतो, ज्यामुळे भीषण अपघात होऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये एका कारचा भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील महिलेने रहदारीच्या रस्त्यावर आपली कार उभी केल्याचं दिसत आहे. यावेळी त्या रस्त्यावरुन अनेक वाहनं ये-जा करताना दिसत आहे. यावेळी कारमधील महिला मागे न पाहता थेट कारचा दरवाजा उघडते, ज्यामुळे मागून येणारी भरधाव कार दरवाज्याला धडक देते आणि भीषण अपघात होतो. या धक्कादायक अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

हेही वाचा- आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुन काढणं कंपनीला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

महिलेच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ @crazyclipsonly नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर गाडीचा दरवाचा उघडताना खबरदारी घेणं किती महत्वाचं आहे हे पाहायला मिळत आहे. शिवाय आपली थोडीशी चूकदेखील भीषण अपघाताचे कारण बनू शकते याचेचं उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. या अपघाताचा व्हिडीओ आतापर्यंत ५.७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. तसंच अनेक नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader