Terrible Accident Video: गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. पण, या व्यतिरिक्त बसमध्ये, ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांबरोबरदेखील अपघात होऊ शकतात आणि यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. आपल्याला अगदी लहानपणापासून सांगितलं जातं की खिडकीबाहेर हात काढू नकोस…, पण तरीही या गोष्टींना इतकं महत्त्व न देता प्रवासी खिडकीबाहेर हात काढून बसतात आणि यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशीच एक घटना एका व्यक्तीबरोबर घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस खिडकीच्या बाहेर हात काढून बसला असतो आणि यादरम्यान त्याला गंभीर दुखापत होते.

हेही वाचा… अशी मुलगी कधीच चुकीच्या मार्गाला लागत नाही! डिलीव्हरी गर्लचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओत प्रवासी बसमधून आपल्या इच्छित स्थळी जाताना दिसतायत. यात एक माणूस खिडकीच्या बाहेर हात काढून बसलाय. भरवेगात असलेली बस सुरू असताना अचानक बाजूला एक खांब येतो आणि त्या माणसाचा हात खांबाला जोरात लागतो. खांबाला हात लागताच तो माणूस जोरात ओरडतो आणि त्याच्या हाताला जबरदस्त मार लागल्याचं या व्हिडीओमध्येही दिसून येतंय.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/C9Jajy7S-cC/?igsh=d2x3dmFlcDlsNWNi

हा व्हायरल व्हिडीओ @motivation_line_daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आपला हात बसमधून बाहेर काढू नका, तुम्ही यामुळे तुमचा हात गमावू शकता; सतर्क राहा, सुरक्षित राहा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल सात मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… VIDEO: “अगं काहीतरी लाज बाळग”, भररस्त्यात टॉवेल काढलं अन्…, तरुणीचा अश्लील डान्स पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या माणसाबद्दल खूप वाईट वाटते”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं की, “यात चालकाची चूक आहे, त्याने इतक्या बाहेर हात नव्हता ठेवला.” तर तिसऱ्याने, “लोकांना इतकं साध कळत नाही की बसच्या बाहेर हात काढू नये,” अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrible accident of man put his hand out of the window and it hit the pillar video viral dvr