पाण्याच्या ताकदीसमोर भल्याभल्यांची अवस्था बिकट होते. जर पाण्याने आपली ताकद दाखवली, तर चांगल्या गोष्टींचा विनाश होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्यामध्ये समुद्राच्या लाटांचे महाकाय रूप पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओद्वारे निसर्गाशी खेळ केलात, तर काय वाईट स्थिती होईल, असा मेसेज देण्यात आला आहे. व्हिडीओच्या कमेंटमध्ये काही लोकांनी हा व्हिडीओ स्पेनमधील कॅनरी आयलंड येथील असल्याचे म्हटले आहे; जिथे ही इमारत समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रकिनारी बांधलेल्या इमारतीला समुद्राच्या लाटेचा तडाखा बसतो, तेव्हा ही मजबूत काँक्रीटची बाल्कनी पत्त्याच्या पानांसारखी खाली कोसळते. समुद्राच्या लाटेची ताकद आणि समुद्रतांडवाचे हे दृश्य पाहून तुम्हीही घाबरून जाल. विचार करा, त्यावेळी या इमारतीच्या बाल्कनीत लोक हजर असते, तर त्यांची काय अवस्था झाली असती. हा व्हिडीओ शिप स्पॉटिंग ग्रीस नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

धोकादायक ठिकाणी इमारत का बांधली? युजर्सचा सवाल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय बनत आहे. समुद्रकिनारी ही इमारत बांधताना बिल्डरने काय विचार केला असेल, असा प्रश्न आजा युजर्स उपस्थित करीत आहेत. या इमारतीला मंजुरी कशी दिली गेली आणि अशी रिस्क घेऊन तिथे राहण्याचा विचार करणारी माणसं कोण असतील, असा प्रश्नही युजर्स उपस्थित करीत आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘या इमारतीसोबत असेच व्हायला हवे होते.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘अखेर कोणाच्या सांगण्यावरून इथे इमारत बांधली गेली. सध्या सी फेसिंग इमारतींचा ट्रेंड आहे; परंतु या धोकादायक ठिकाणी इमारत बांधून बिल्डरने खरोखरच लोकांचा जीव धोक्यात घातला आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrific video viral waves destory building in second floor balcony near the beach see horrifying video sjr
Show comments