Bus Accident Video: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, अशाप्रकारच्या अनेक सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. एक अपघात आपलं किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवू शकतो हेदेखील आजकाल कोणाला कळत नाही.
रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सोशल मीडियावर अनेकदा अशा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अंगावर अक्षरश: काटा येईल. या अपघाताच्या घटनेत नेमकं घडलं काय? ते जाणून घेऊ या…
हेही वाचा… स्कोडाने केली सगळ्यांची बोलती बंद! सर्वात स्वस्त एसयूव्ही झाली लाँच, किंमत फक्त…
अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एका बसमध्ये बस ड्रायव्हरसह एक महिला आणि एक लहान मुलगा प्रवास करत आहे, बाकी संपूर्ण बस रिकामी आहे.
बस आपल्या रस्त्याने जात असताना अचानक बसचा भयंकर अपघात होतो. बाजूने भरवेगात जाणारी गाडी बसवर आदळते आणि बस उलटी होते. बस उलटी होताच महिला जोरात आदळते आणि या अपघातात लहान मुलगाही खाली कोसळतो आणि त्याला दुखापत होते. पण, क्षणाचाही विलंब न करता ती मुलाला लगेच उचलते घेते आणि दोघंही बसच्या बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधतात.
हा व्हिडीओ @shahaporan17.6k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
दरम्यान, अपघाताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा गंभीर अपघात नेमका कुठे घडला हे अद्याप कळू शकलेले नाही.