Scary Accident Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो वाऱ्याच्या वेगाप्रमाणे व्हायरल होतात. त्यामुळे भारतातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घडलेल्या घटनांचे फुटेज लगेच सोशल मीडियावर दिसतात. त्यातील अनेक व्हिडीओ हे फार धक्कादायक आणि विचित्र असतात. या व्हिडीओंमुळे जगात काय घडतेय हे समजते. सध्या अशाच एका धक्कादायक विचित्र घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहताना खरंच तुम्हालाही धडकी भरेल. ही दुर्घटना दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातील आहे.
नेमकी दुर्घटना काय?
दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशामधील एक अतिशय धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पदपथावरून काही लोक जात असताना जमिनीखालून एक भीषण स्फोट झाला. त्यावेळी स्फोटामुळे जमिनीला मोठे भगदाड पडले आणि पदपथावरून चालणारी एक महिला त्या खड्ड्यात जोरात कोसळल्याचे दिसून येते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात मोठ्या स्वरूपात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज खरोखरच अंगावर शहारे आणणारे आहे.
व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता की, लोक शांतपणे पदपथावरून चालत होते. मात्र, एक महिला तिथून जात असतानाच अचानक भूमिगत इलेक्ट्रिक बॉक्समध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, रस्त्यावर खोल खड्डा पडला, ज्यात पदपथावरून चालणारी महिला जोरात कोसळली.
हा स्फोट इतका भीषण होता की, पदपथावरील एक सिमेंटचा स्लॅबही चक्क हवेत उडाला आणि तो महिलेच्या हातावर पडला. या स्फोटात आगीच्या भयंकर ज्वाळा उठल्या. सुदैवाने लष्कराचा एक जवान घटनास्थळी गस्त घालत होता. तो लगेचच महिलेच्या मदतीसाठी धावत आला. पेरूमधील लिमा या शहरात ५ डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली. स्फोटामुळे ती महिला गंभीर जखमी झाली.