झोका खेळायला कोणाला आवडत नाही. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने लहानपणी झोका खेळण्याचा आनंद घेतला असेल. गावी झाडच्या फांदीला झोका बांधून मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद अनेकांनी घेतला असेल. शहरात बागेमध्ये आजही लहानमुले झोका खेळताना दिसतात. झोका खेळण्याची आता नवा ट्रेंड आला आहे. आजकाल अनेक पर्यटन स्थळी उंच डोंगरावर, खोल दरीच्या टोकाला झोक्यावर बसण्याचा आनंद अनेकजण घेतात. अशा झोक्यावर बसणे साहसी खेळ म्हणून पाहिले जाते त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाणी अशा झोक्यावर बसून फोटो शूट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. गोवा, बालीसह अनेक पर्यटन स्थळी असे झोके पाहायला मिळतात. सोशल मिडियावर अशा झोक्यावर बसलेल्या पर्यटकांचे फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान अशाच एका झोक्यचा आनंद घेणाऱ्या मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या काळजात धस्स होऊ शकते कारण व्हिडीओमध्ये झोका खेळताना मित्रांसह एक अपघात होतो पण थोडक्यात दोघांचा जीव वाचतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा