Terrifying Video : माणसाने वेदना सोसाव्यात तरी किती, काही हद्द, असा सवाल तुम्ही व्हायरल होणारा अतिशय वेदनादायी व्हिडीओ पाहून उपस्थित कराल. कारण- तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टेम (उत्तरीय तपासणी) केले जाते. त्यानंतरच तो मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला जातो आणि मग त्यावर रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, एखादा मृतदेह बेवारस असेल, तर रुग्णालयामध्ये त्याचे काय हाल होत असतील याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर माणुसकीलाही लाजवेल असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, तो एकदा पाहा, ज्यात पोस्टमार्टेम हाऊसबाहेरून (उत्तरीय तपासणी कक्ष) ज्या पद्धतीने मृतदेह नेला जात आहे, ते पाहून तुमच्याही काळजाचे पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. झाशीमध्ये घडलेली ही घटना पाहून मृत्यूनंतरही माणसाच्या मरण यातना संपेनात, असे म्हणावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा