Bull attacked an elderly man: माणूस आणि प्राण्यांचं हे नातं अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. माणसं जेवढी प्राण्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. त्यापेक्षाही प्राणी माणसांना जास्त जीव लावतात. मुक्या जनावरांच्या या भावना ते नेहमीच त्यांच्या कृतीतून वेळोवेळी व्यक्त करीत असतात.
जंगलतोडीमुळे मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर आता अगदी सामान्य झाला आहे. आजकाल गैरसोय, गैरवर्तणूक किंवा अन्य गोष्टींमुळे काही प्राणी धोकादायक ठरू लागले आहेत. ते कधीही, कुठेही येऊन कोणावरही हल्ला करू लागले आहेत. प्राणी खवळले, तर ते कोणालाही ऐकत नाहीत. सध्या असाच काहीसा प्रकार एका वयोवृद्धाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका बैलाने एका वयोवृद्धावर हल्ला केला. नेमकं असं घडलं तरी काय? जाणून घेऊ या.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका ठिकाणी एक वयोवृद्ध आपल्या वाटेने चालताना दिसतोय. पण अचानक समोरून एक बैल येतो आणि वयोवृद्धाच्या मागेच लागतो. वयोवृद्ध त्याला हाकलवण्याचा आणि त्याच्यापासून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतो. पण तिथून पळ काढताना वयोवृ्द्धाबरोबर एक धक्कादायक घटना घडते. बैलापासून लांब पळून जाण्यासाठी वृद्ध तिथून निसटणारच इतक्यात बैल वृद्धाला शिंगाला धरून उचलतो आणि लांबच्या लांब फेकून देतो. उंचीवरून पडल्याने वृद्धाला दुखापत होते आणि तो तिथेच पडून राहतो. हे पाहताच तिथे एक दोन व्यक्ती येतात आणि बैलाला पळवून लावतात.
हा व्हिडीओ @iamuday._18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ७.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळलेलं नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. नेटकऱ्यांनी यावर आपल्या भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याने इतर कोणावरही हल्ला केला नाही, त्या आजोबांनी नक्कीच त्या प्राण्याशी गैरवर्तन केले असेल” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, कृपया प्राण्यांपासून दूर राहा, त्यांचा काही भरवसा नाही” तर एकाने “तो फक्त एक प्राणी आहे.. अशा घटना जगभर घडत असतात” अशी कमेंट केली.