सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. रेल्वेचा प्रवास हा मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. ट्रेनमध्ये अनेकदा स्टंट करणाऱ्या तरुणांना तुम्ही पाहिलं असेलच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तरुण असं सगळं काही करताना दिसतात. अशी मजा-मस्ती करण्याच्या नादात अनेकांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो. पण, तुम्ही कोणत्या महिलेला धावती ट्रेन पकडताना पाहिलंय का? सोशल मीडियावर सध्या या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ही महिला भरवेगात आलेल्या ट्रेनला लटकताना दिसतेय. समजून घ्या नेमकं प्रकरण काय…

हेही वाचा… हा काय प्रकार! कारचालकाच्या ‘त्या’ कृतीमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने फोडली कारची काच, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतेय. ट्रेन भरवेगात आपल्या दिशेने जात असताना ही महिला धावत धावत ती ट्रेन पकडते आणि ट्रेनच्या दरवाजाच्या खालच्या बाजूला लटकते. दरवाजाला लटकल्यानंतर ती खाली पडणार इतक्यात कसाबसा स्वत:चा तोल सांभाळते आणि दाराला पकडून ट्रेनमध्ये चढते.

हा व्हायरल व्हिडीओ @railway_wale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “आता यांना काय बोलणार?” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून, ते आतापर्यंत त्याला तब्बल दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… ‘तांबडी चांबडी’ गाण्यावर डान्स करताना रस्त्यावर झोपला अन्…, परदेशातील ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नशीब चांगलं होतं.” तर दुसऱ्याने, “खतरों के खिलाडी,” अशी कमेंट केली. एकाने तर, “हा काय मूर्खपणा आहे,” अशी कमेंट केली. तसेच, दुसरी ट्रेन मिळणार नाही का, जीवापेक्षा ट्रेन महत्त्वाची, काकी जरा दमानं अशाही अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrifying video of a woman catching running train viral video on social media dvr