Terrifying Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशात अनेकदा घरातल्या साफसफाईचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा घरात साफसफाई करताना आपल्या नकळत काही गोष्टी घडतात, मग याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. कधीही पंखा, लाईट, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूची साफसफाई करताना नेहमी त्याचा स्विच बंद करून आणि प्लग काढून साफसफाई करण्यास सांगितली जाते. कारण यातून येणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे कधीही अनर्थ घडू शकतो आणि कोणालाही विजेचा झटका बसू शकतो. पण, इतकं सगळं असतानाही काही माणसं याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे स्वत:च्या जीवाशी खेळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक महिला फ्रिज साफ करत असताना खाली कोसळते. या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ…

हेही वाचा… मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला फ्रिज साफ करताना दिसतेय. फ्रिजमधील सगळं सामान बाहेर काढून ही महिला ओल्या फडक्याने फ्रिज साफ करतेय. फ्रिजचा काना कोपरा अगदी स्वच्छ राहावा यासाठी ती जबाबदारीने सगळं चकाचक करताना दिसतेय. तेवढ्यात अचानक तिला जोराचा झटका लागतो आणि ती तशीच खाली कोसळते. खाली कोसळल्या कोसळल्या तिची शुद्ध हरपते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @best.motivational_23.1111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला फ्रिज सावधानीसे साफ करे असं कॅप्शन देण्यात आलं आहे. नऊ तासांआधी शेअर केलेल्या या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

हेही वाचा… “अर्ध्या तासांनी या” हे सांगितल्यावर महिला कर्मचाऱ्याच्या केबिनची काच फोडून तो आत घुसला, पुढे तरुणाने जे काही केलं ते पाहून उडेल थरकाप

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “फ्रिज बंद केल्यानंतरच त्याची साफसफाई करावी” अशी कमेंट एकाने केली, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, बिचारीबरोबर खूप वाईट झालं. तर अनेकांनी हा व्हिडीओ फेक आहे असं सांगून कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrifying video of a woman electrocuted while cleaning the fridge she fell down due to electric shock viral video dvr