आजच्या काळात अनेकांना फोनचं व्यसन लागलं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांना फोन हवा असतो. यावरच आपलं जीवन अवलंबून आहे असं अनेकांना वाटत असतं. या नादात अनेकदा दुर्घटना होतात, वाईट परिस्थिती ओढावते तर काहींना जीवालाही मुकाव लागतं.

कामापुरता फोन वापरणं वेगळं आणि फोनचं व्यसन लागणं वेगळं. ज्यांना फोनचं व्यसन लागतं त्यांना आजूबाजूला नेमकं काय घडतंय हेदेखील कळत नाही. ते आपल्याच दुनियेत मग्न असतात. त्यांना जगाची जणू पर्वाच नसते. पण यासगळ्यात आपल्यासोबतच दुसऱ्याला तर त्रास होत नाही आहे ना हेदेखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. याआधीही अनेकदा फोन बघत असल्याने अनेकांचे भयंकर अपघात झाले आहेत. सध्या असाच काहीसा प्रकार एका महिलेबरोबर आणि तिच्या ९ महिन्याच्या चिमुकल्याबरोबर घडला आहे. फोनवर बघता बघता असं काही झालं की ते पाहून, तुम्हालाही बसेल धक्का…

Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Groom dance on marathi song
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” मारवाडी नवरदेवानं बायकोसाठी मराठी गाण्यावर केला खतरनाक डान्स
Transport Minister Pratap Sarnaik urged creating role model for sustainable environment friendly development taking place at open space of ST
ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Woman breaks glass door of society after catching security guard sleeping on dusty in greater noida shocking video viral
शेवटी तीही माणसंच! सुरक्षा रक्षकाचा लागला डोळा; अद्दल घडवण्यासाठी महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, VIDEO पाहून सांगा हे कितपत योग्य?
Sambhaji Raje Chhatrapati on Chhaava Trailer Dance
Chhaava Trailer: ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखविल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे संतापले
aap mla amanatullah khan son
“मला लायसन्सची गरज नाही, माझा बाप…”, आप आमदाराच्या मुलाची वाहतूक पोलिसांवर अरेरावी, वाहतुकीचे नियम मोडून म्हणाला…

आई आणि बाळाबरोबर घडली दुर्घटना

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या ९ महिन्याच्या मुलाला घेऊन रस्त्यावरून चालताना दिसतेय. पण चालताना तिचं लक्ष रस्त्यावर नसून फोनमध्ये असतं. फोनवर बोलत असल्यामुळे रस्त्यावर असलेला भलामोठा गटाराचा खड्डा तिला दिसला नाही आणि चिमुकल्यासह ती त्या खड्ड्यात पडली. खड्ड्यात जोरात पडल्यामुळे चिमुकल्याचं डोक आपटतं आणि डोक्यालाही मार लागतो.

तिथे उपस्थित असणाऱ्या काहींना हा अपघात दिसला आणि तिच्या मदतीसाठी माणसं धावून गेली. एक माणूस त्या खड्ड्यातदेखील उतरला आणि त्याने आई आणि मुलाला बाहेर काढलं.

इन्स्टाग्रामवरील @explorewithdeepti या अकाउंटवरून महिलेचा आणि बाळाचा हा व्हिडीओ एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आला असून याला १ लाखाच्यावर व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील हा व्हिडओ पाहून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “रस्त्यावर चालत असताना कधीही फोन वापरू नका.” तर दुसऱ्याने “थोडं मोबाईलवरून लक्ष वळवलं असतं तर खाली काय आहे ते दिसलं असतं.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “फक्त एका फोनमुळे त्या मुलाच्या डोक्याला आपटलं, हे किती वेदनादायक आहे”

Story img Loader